तळा शहरात विनाकारण फिरताना आढळल्यास होईल कोरोना तपासणी : ४५जणाची झाली तपासणी.



तळा -किशोर पितळे
तळा शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची तळा पोलीस प्रशासनाकडून कोरोनाचाचणी करण्यात येत आहे.एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी सारखे नियम लागू केले असताना बाजारपेठ सकाळी ७ते४वा.सुरू आहे त्यानंतर बाजारपेठ बंद झाल्यावर ही तळा शहरात विनाकारण अनेक जण बाहेरफिरत असतात. या पार्श्वभूमीवरतळा शहरात दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळी रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी तळा पोलीस प्रशासनाने कडक धोरणराबविण्यात सुरुवात केली आहेकोरोनाच्यावाढत्यासंसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातगेल्या महिना भरापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले असताना तालूक्यातील कोरोना रूग्ण संख्याचा आलेख वाढत आहे. काल पर्यत ही संख्या ३८९वर पोहोचली आहे.त्यामुळे भितीचे वातावण असून ही नागरीक अजूनही गांभीर्याने घेताना दिसत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशा लोकांची महत्त्वाचा शहर प्रवेशद्वाराचे ठिकाणी किंवा त्याच ठिकाणी रस्त्यावरअँटीजन टेस्ट तळा पोलीस व आरोग्य विभागा कडून करण्यात येत आहे. काल आणी आज ४५ जणांची अँटीजेन्स टेस्ट करण्यात आलीअसून २पाँझेटीव्हअसल्याचे आढळून आले आहेत त्यामुळे खबरदार... नागरिक हो. घरीच राहा सुरक्षित राहा विनाकारण फिरताना आढळल्यास कोरोना चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे सहा.पोलीसनिरीक्षक शिवराज खराडे,सोनाली जवादे, तळा पोलीस ठाणे कर्मचारी वर्ग, नगरपंचायतीचे राजेश शिंदे, आरोग्य विभागाचे मोहित मोरे व कर्मचारीआपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा