तळा -किशोर पितळे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी६जून१६७४ साली
काशीचे विद्य्वान पंडीत वेदमूर्ती गागाभट्ट यांच्या आज्ञेनुसार रायगडावर शिव राज्याभिषेक करण्यात आला होता. त्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र भर ६जुन रोजी साजरा करण्याचे शासनाने आदेश देण्यात आले असल्याने पं स.तळा येथे सकाळी शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली होती. त्यावेळी गटविकास अधिकारी विजययादव, ग्रामविकास अधिकारी पुष्पा नेरकर,लेखनीक सौ.पाटील, शिक्षक वर्ग, क़ेंद्रप्रमुख कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी शिवशाहीर सचिन कांबळे गुरुजी आणी सहकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचे पोवाड्याच्या माध्यमातून इतिहासची पाने उलगडली. अतिशय सुंदरतेने शिवराज्याभिषेक व शिवस्वराज्यगुढी उभारून साजरा करण्यात आला.
Post a Comment