तळा .किशोर पितळे.तळा तालुक्यातीलगिरणेग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.ज्योती कैलास पायगुडे यांची सरपंच सेवा महासंघाच्या तळा तालुकाध्यक्षा पदी निवड करण्यात आली आहे. ज्योती पायगुडे या तालुक्यातील भाजपच्या पहिल्या महिला सरपंच असून त्यांनी आपल्या गिरणे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना अनेक योजनांचा लाभ मिळवुन दिला आहे.यांसह सध्याच्या कोरोना काळात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली असून गावात नियमित जंतुनाशक फवारणी करून घेणे, नागरिकांची आरोग्य तपासणी, लसीकरण तसेच ग्रामपंचायतीमार्फत गावात अनेक विकासकामे देखील केली आहेत.कोरोना लसीकरण उपक्रम राबविले त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील जनतेला एकाचवेळी लस घेऊन लसी संदर्भात असलेल्या गैरसमज दूर केला. स्वच्छपाणी पुरवठा योजना एक ना अनेक शासनाच्या योजनेचा लाभ तळागाळातील जनतेला करून दिला.त्यामुळे ग्रामीण ग्रामीण भागातील विकासाचे क्रांतिकारक सर्व गुण पाहता सरपंच सेवामहासंघाचे संस्थापक, राज्यअध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी त्यांची तालुकाध्यक्षा पदावर नुकतीच नियुक्ती केली आहे. सरपंच सेवा महासंघ ही संघटना सरपंचाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव नोंदणीकृत संघटना आहे. या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने विविध मागण्या मंजूर करून घेतल्या आहेत. ज्योती पायगुडे यांच्या सारख्या उच्चशिक्षित सरपंच महिलेची तळा तालुकाध्यक्षापदी निवड झाल्याने तालुक्यातील सरपंचांचे प्रश्न, समस्या मांडण्यासाठी उत्कृष्ट नेतृत्व मिळाल्याचे मत तालुक्यातील सरपंचांमधून व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सरपंच सेवा महासंघाच्या तळा तालुकाध्यक्षापदी ज्योती पायगुडे यांची नियुक्ती.
Admin Team
0
Post a Comment