पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रुग्णवाहीकेचे लोकार्पण.



तळा-किशोर पितळे
कोरोना संसर्गाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे.आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे.त्यातच ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत.असे प्रकारही पाहायला मिळाले आहेत. ही बाब लक्षात घेऊ आ.अनिकेत तटकरे यांनी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका आज दि.१४/५/२१ रोजी तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आली त्याचप्रमाणे सर्व सुविधांनी सुसज्ज अशा रुग्णवाहिकीचे लोकार्पण पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते पार पडले आ.अनिकेत तटकरे यांनीमात्रअगदी वेगळ्या पद्धतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले.फित कापण्याच्या औपचारिकतेपलीकडे जात रुग्णवाहिका चालवून आ.अनिकेत तटकरे यांनी लोकार्पण पार पाडले. त्यामुळे हा सोहळा लक्ष्यवेधी ठरला.

         तळा तालुक्यात आरोग्य सुविधांबाबत लोकांची अनेकगाऱ्हाणी होती.ही बाब ध्यानात घेवूनपालकमंत्री अदिती तटकरे यांनी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर दिलाआहे.स्थानिकविकासनिधीच्या पुढे जावून तटकरे कुटुंबीयांकडुन सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या मार्फत आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सुसज्ज अशी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.सध्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना तळा तालुक्यासाठी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णवाहिका देण्यात आली यासाठी सर्व तळेवासीयांनी पालकमंत्री अदितीतटकरे आणि आ.अनिकेत तटकरे यांचे आभार मानले आहेत या लोकर्पण सोहळ्यासाठी सभापती अक्षरा कदम, उपसभापती गणेश वाघमारे, राजिप महीला बाल कल्याण सभापती गीता जाधव, राजिप सदस्य बबन चाचले,माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, माजी उपनगराध्यक्षासायली खातु,नगरसेविकानेहापांढरकामे नगरसेवक अँड.चेतन चव्हाण,नगरसेवक चंद्रकांत रोडे अँड.उत्तम जाधव वैद्यकीय अधिकारी डाॅ.अमोल बिरवटकर,डाॅ.विनोदगोरेगावकर,डाॅ.प्राचीघोसाळकर,तनुजा मुळे (जेष्ठ परिचारिका)आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा