म्हसळा नगर पंचायतीची दवंडी देवुन सतर्कतेच्या सुचना.


ताउक्ते Tauktae चक्रीवादळ संपेपर्यंत नागरिकांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी - मनोज उकिर्डे


म्हसळा - प्रतिनिधी

मागील वर्षी 3 जुन 2020 रोजी रायगड जिल्ह्यात झालेल्या भयानक निसर्ग चक्रीवादळाचे वेळी नागरिकांना शासनाने आगाऊ सुचना दिल्या असता नागरिकांनी ज्या पद्धतीने आपल्या जीवाची काळजी घेतली त्याच पद्धतीने उद्या दिनांक 16 व 17 मे 2021 रोजी होणाऱ्या तौक्ते taukte चक्रीवादळ संपेपर्यंत म्हसळा वासीय नागरिकांनी आपल्या जीवाची तशीच काळजी घ्यावी असे जाहीर आवाहन म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.भारतीय हवामान खात्याचे पुर्व सूचनेनुसार अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तौक्ते,taukate चक्रीवादळ निर्माण होणार आहे.ह्या वादळाचा वेग प्रति तास 45 ते 60 किलोमीटर इतका असणार आहे किंबहुना त्याच्या वेगात वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.हे वादळ दिनांक 16 व 17 मे रोजी केरळ,गुजरात मार्गे रायगड,रत्नागिरी,ठाणे जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर धडकणार असल्याने म्हसळा शहरातील सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणुन नगर पंचायतीने दवंडी देवुन सतर्कता बाळगणे बाबत सुचित केले आहे.वादळा सोबतच मुसळधार पावसाची शक्यता आहे.काळ पासुन पावसाने सुरुवात करून तसे रंग दाखवले आहेत.अशा वेळी खबरदारी म्हणून नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडु नये,ज्यांची घरे कच्च्या विटामातीची किंवा जीर्ण आहेत अशा घरातील नागरिकांनी चक्रीवादळाचा धोका टळेपर्यंत सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, विद्युत पुरवठा खंडीत होण्याची शक्यता असल्याने मोबाईल, बॅटरी चार्ज करून ठेवावे,प्रकाश देणारे विद्यूत दिवे सोबतीला ठेवावे,घरातील किमती वस्तू आणि आवश्यक अन्नपाणी सुरक्षित स्थळी नेऊन ठेवावेत,इमारतीच्या काचेच्या तावदाने पासुन दुर रहावे, धोकादायक वृक्ष, विद्युतपोळ पासुन लांब रहावे,आपली वाहने झाडांच्या खाली पार्क असल्यास मोकळ्या जागेत ठेवावी. मच्छीमार करणाऱ्या लोकांनी किंवा समुद्र सफर,पोहण्यास जाणाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये. आपला जीव आपल्या मिळकती पेक्षा मौलिक असल्याने प्रथम आपल्या जीवितास प्राधान्य द्यावे. पाळीव प्राणी व पशुधनाची काळजी घ्यावी त्यांना सुरक्षित स्थळी हलवावे.आदी बाबींची चक्रीवादळा पासुन सुरक्षित राहण्यासाठी काळजी घ्यावी आणि योग्य खबरदारी घेत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन म्हसळा नगर पंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनोज उकिर्डे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीरपणे सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा