स्वच्छता करताना शेजाऱ्याने शूटींग केले : दंडका- पाईपने मारहाण म्हसळा पोलीसात गुन्हा दाखल.



संजय खांबेटे : म्हसळा 
आपल्या मालकीचे कंपाऊंड वॉल व परिसराची स्वच्छता करून ते जाळत असताना शेजाऱ्याने मोबाईल मध्ये शूटींग केले याचा राग आल्याने फिर्यादीने शेजाऱ्या ला तू शूटींग का करतो असे विचारल्याने प्रथम राग मग बाचाबाची त्याचे पर्यवसन लोखंडी पाईप ,लाकडी दांडक्याने व हाता बुक्क्यानी मारहाणीत झाले.  घटनेची तक्रार नवाज मझहर दिसवाग वय ३४ रा .नवेनगर, म्हसळा यानी  इकबाल अब्दुल रशीद म्हसलाई  व अन्य चौघां विरूध्द केल्याने म्हसळा पोलीसानी गुन्हा रजी नं ४० / २०२१ भा.द.कलम१४१,१४३,१४७, १४९,३२४,३२३,५८४, ५८६प्रमाणे नोंदवि ला आसल्याचे ठाणे अंमलदार हे.कॉ. मिलींद सुर्वे यानी सांगीतले.सदर गुन्ह्याचा तपास पोहवा संतोष चव्हाण करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा