म्हसळा तालुक्यातील खारगांव (बु) ला पाणी टंचाई ; कायम स्वरुपी डोक्यावरचा हंडा उतरवा : महीला वर्गाची मागणी.



संजय खांबेटे : म्हसळा 

म्हसळा तालुक्यातील म्हसळा शहराचे उपनगर संबोधले जाणाऱ्या खारगांव (बुद्रुक)ला मागील दोन वर्ष उन्हाळ  पावसाळ्यात पिण्याचे पाण्याची तीव्र टंचाई होते. मागिल १ महिन्यापासून गावातील तीनही विहीरीतील पाणी पूर्ण पणे आटले आहे. तालुक्यातील अन्य नळ पाणी योजनां प्रमाणे येथेही शासनाचे निष्क्रियतेमुळे मंजूर योजनेला विलंब होत आहे. तर पावसाळ्या त गवळणीचे पाण्यात चिखल येतो तर काही वेळा पाईप वाहुन जाण्याच्या घटना घडतात. यामुळे गावातील महीला वर्ग व वृध्दाना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते.
  खारगांव (बुद्रुक) हे गाव म्हसळा शहरापासून केवळ चार कि. मीटर वर असलेले सुमारे १५०० ते १८०० लोकसंखेचे गाव, गावात जुन्या तीन वीहीरी आहेत.एक विहीर तळ्याशेजारी व अन्य दोन शेताच्या शेजारी व जंगलातील गवळणीचे पाण्याचे स्रोत (जुनी ग्रॅव्हीटी योजना) हे सर्वच स्त्रोत वाढत्या उन्हाळ्यात आटले आसल्याचे जुनी जाणती मंडळी सांगतात.

    खारगाव बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून ३७.६५ लक्ष रुपयांची योजना मंजूर आहे. योजनेची वर्कऑर्डर ८मार्च २०१९ला दिलेली आहे. स्थानिक ग्रा.पा.पु. समिती व ग्रामस्थांच्या मागणीनुसार जुन्या ग्रॅव्हिटी स्त्रोतावर नवीन पाइपलाईनने योजना करण्याचे प्रस्तावित आहे.पाइपलाईन टाकण्यासाठी अडचणी आल्या होत्या त्या दूर झाल्याचे ग्रा.पा.पु. विभागाकडून सांगण्यात येते.

"राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून ३७.६५ लक्ष रुपयांची योजना खारगाव बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी झाली आहे.  खारगाव बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी झाली आहे.हवामानातील बदलामुळे व वाढत्या उष्णते मुळे गवळणीचे पाण्याचे स्रोत पूर्ण आटले आहे, येत्या ४-५ दिवसांत टंचाईचे काळात पाभरे धरणातून पाणी Lift ने गावांत वितरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत "
अनंत नाक्ती , सरपंच खारगाव बुद्रुक ग्रामपंचायत.

"पाणी पुरवठा योजनांची कामे राजकीय कार्यकर्ते घेतात. अनेक वर्ष ती कामे अपूर्ण राहतात. निधी खर्ची पडतो. त्यामुळे ज्या योजना अपूर्ण आहेत त्यांचा आढावा घेतले ला नाही. तो घेण्याची आवश्यकता आहे. पाणीटंचाई निवारणार्थ ज्या उपाययोजना हाती घेतल्या जातात, त्या काळजीपूर्वक पाहिल्यास विशिष्ट तालुक्यात विशिष्ट गावात त्या वारंवार राबवाव्या लागतात का?याचा शोध घेतला तर बरेच काही कळू शकेल."

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा