खरसई आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाला सुरुवात : पहिल्याच दिवशी ८५ नागरिकांनी घेतला लाभ


टीम म्हसळा लाईव्ह

करोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण जग मागील वर्षापासून ठप्प झाले आहे . कोरोना संसर्गाच्या लाटा थांबता थांबत नसल्याने नागरिक चिंतेत व भयभीत झाले आहेत व त्यात करोना ची आलेली दुसरी लाट ही भयानक व चिंतेत भर टाकणारी आहे.या भितीयुक्त वातावरणा मधुन मुक्तीची आशा म्हणजेच करोना प्रतिबंधक लस टोचुन घेणे असून नागरिकांनी आता लस घेण्यास पुढाकार घेतला आहे .मागील काही महिन्याची परिस्थिती बघता ग्रामीण भागात या लसीकरणास फार काही लोकांचा लस घेण्यास उत्साह दिसून येत नव्हता ग्रामीण भागातील जनतेने मात्र आता करोनाची दुसरी लाट वेगाने नागरिकांवर प्रभाव करीत आहे हे अनुभवल्याने त्यामुळे आता ग्रामीण भागात ही लस घेण्यासाठी गर्दी होत आहे.

 खरसई व परिसरातील लोकांचा लसीकरण केंद्रावर जाण्याचा त्रास कमी व्हावा यासाठी खरसई सरपंच निलेश मांदाडकर यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आजपासून खरसई आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाला सुरुवात झाली असून ८५ लाभार्थींनी लसीकरणाचा लाभ घेतला. खरसई उपकेंद्रात लस उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले. यावेळी जि प कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, म्हसळा सभापती छाया म्हात्रे, पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रभे खरसई सरपंच निलेश मांदाडकर आदी मान्यवरांनी खरसई आरोग्य उपकेंद्राला भेट दिली.


खरसई उपकेंद्रात लस उपलब्ध झाल्यामुळे खरसई , गणेश नगर, बनोटी , रेवली, या गावातील बऱ्याचश्या ज्येष्ठ नागरिकांनी पहिला डोस घेतला. कारण मेंदडी व म्हसळा इथे जाण्यासाठी या भागातील ज्येष्ठ लोकांना वाहतुकीची साधने बंद असल्याने प्रवास परवडणारा नव्हता.  खरसई उपकेंद्रात रोज लस उपलब्ध झाल्यास सर्वांना सोयीचे होईल. 
प्रकाश गाणेकर, ग्रामस्थ गणेश नगर

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा