श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर
लक्षद्विपमध्ये निर्माण झालेल्या कमीदाबाच्या पट्ट्याचे तौक्ते चक्रीवादळात रूपांतर झाले. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने जात आहे. श्रीवर्धन किनारपट्टीवर दि. १६ मे रोजी रात्री ११ वाजल्यापासून वादळ निर्माण होण्यास सुरुवात झाली. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहिती नुसार दि. १७ मे रोजी रात्री २ वाजता मुख्य वादळ श्रीवर्धन समुद्र किनारी येऊन धडकले. परंतु सोसाट्याचा वारा हा सायंकाळ ६ ते दुसऱ्या दिवशी दुपारी ४ पर्यंत चालू होता. या वेळेस तौक्ते चक्रीवादळाचा वेग ताशी ४० ते ९० कि.मी. इतका होता.
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आज संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याची पाहणी केली. यामध्ये हरिहरेश्वर, कोलमांडला, भरडखोल, दिवेआगर, दिघी या ठिकाणच्या खेडे भागात काही घरांचे कौले व पत्रे उडून गेलेले दिसण्यात आले. वाऱ्याचा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होता परंतु ३ जून च्या वादळा नुसार या वेळेस फार कमी प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा रात्रभर सतर्क राहिली होती. डोंगराळ भागातल्या नागरिकांना शाळा व देऊळ या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले होते. या वेळेस नागरिकांनी योग्य प्रकारे सहकार्य केले. तसेच प्रशासकीय यंत्रनेणे योग्य त्या स्वरूपात व्यवस्था करण्यात आली होती.
काही भागांमध्ये बहुतांश ग्रामीण भागात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे व शासनाला योग्य ते पंचनामे सादर करावे. त्यासोबतच श्रीवर्धकरांनी लवकरात लवकर covid-19 लसीकरण करून घ्यावे व कोरोनाला आळा घालण्याचे कार्य नागरिकांमधूनच व्हावे तरच कोरोणा महामारी मधून लवकर सुटका होईल. रायगडचे खासदार व नागरिकांचे कौटुंबिक आधार या नात्याने योग्य ती काळजी मी घेत आहे. असे प्रतिपादन खा. सुनील तटकरे यांनी केले.
या वेळेस तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानाचे पाहणी करताना खा. सुनील तटकरे, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, श्रीवर्धन नगराध्यक्ष फैसल हूजरूक, माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे व स्वीकृत नगरसेवक सुनील पवार हे उपस्थित होते.
Post a Comment