श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर
अरबी समुद्रात घोंघावणारे ‘ताऊक्ते’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. येत्या १२ तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘ताऊक्ते’ चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे येत्या १२ तासात चक्रीवादळ अधिक सक्रीय होणार आहे.
या चक्रीवादळाची तीव्रता दुपारनंतर वाढणार आहे. सध्या अनेक ठिकाणी सोसायट्याचा वारा सुटलेला दिसून येतो. अनेक ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याच येणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाची खबरदारी लक्षात घेता श्रीवर्धन नगर परिषदेकडून श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेरील मोठमोठी झाडांची काटछाट करण्यात आली आहे. जेणेकरून ती झाडे रुग्णालयाची हानी ठरू नये व जीवित हानी होण्यास कारणीभूत होऊ नये. या उद्देशातून श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण कुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जात आहे. त्याच सोबत रुग्णालयाच्या विद्युत बलाची सुविधा म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या प्रशासनाला एकीकडे कोरोना महामारीला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे येणाऱ्या चक्रीवादळाला सामोरे जायचे आहे.
Post a Comment