रायगड पोलीस दलातील "पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह" प्राप्त पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान
टीम म्हसळा लाईव्ह
पोलीस विभागात उत्तम सेवा केल्याबद्दल सन- 2020 चे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र रायगड पोलीस दलातील 1) संजय गणपत धूपकर, पोलीस हवालदार, बक्कल नंबर 1726, जिल्हा विशेष शाखा, रायगड-अलिबाग, 2) संदीप रघुनाथ रिकामे, चालक- पोलीस हवालदार- बक्कल नंबर 1769, मोटार परिवहन विभाग,रायगड- अलिबाग, 3) सुधीर मधुकर पाटील, पोलीस हवालदार- बक्कल नंबर 1764, पोलीस मुख्यालय, रायगड- अलिबाग, 4) राजेश हिरामण पाटील, पोलीस हवालदार- बक्कल नंबर 1820, जिल्हा विशेष शाखा, रायगड- अलिबाग आणि 5) अनंत लक्ष्मण सकरे, पोलीस हवालदार-बक्कल नंबर 2065, सुरक्षा शाखा, रायगड-अलिबाग यांना जाहीर झाले आहेत.
आज हे सन्मानचिन्ह दि.1 मे, महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सर्व सन्माचिन्हप्राप्त कर्मचाऱ्यांना रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह प्राप्त सर्वांचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ तसेच इतर उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
पोलीस दलातील इतर सहकाऱ्यांनी त्यांचा आदर्श बाळगून उत्कृष्ट कार्य करून पोलीस दलाचे आणि रायगड जिल्ह्याचे नाव उंचवावे, असे आवाहन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना केले.
महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यादरम्यान विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यातर्फे प्रतिवर्षी "पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह" जाहीर केले जाते. सन- 2020 या वर्षात महाराष्ट्र पोलीस दलातील 799 पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दि. 30 एप्रिल 2021 रोजी जाहीर झाले आहे.
Post a Comment