म्हसळयामध्ये ताउक्ते चक्रीवादळाचा तडाखा : अनेक घरांचे नुकसान : लाखोची वित्तहानी

म्हसळा तालुक्यात ताउक्ते वादळामुळे नुकसान झालेले घर दिसत आहेत.


म्हसळा (निकेश कोकचा)
म्हसळा तालुक्याला १६ मे रोजी रात्री उशिरा ताउक्ते चक्रीवादळाचा फटका बसला असून, या वादळामुळे तालुक्यातील बहुतांश गावामध्ये घरांचे नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले.
३ जून २०२० रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळातून नागरिक सावरत असतानाच,१६ मे रोजी पुन्हा ताउक्ते नावाच्या चक्री वादळाने श्रीवर्धन किनारपट्टीवर धडक दिली.प्रशासन सज्ज असल्याने तालुक्यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.समुद्रामध्ये वादळाचे केंद्र  १४० किलोमीटर आत असले तरी या वादळाच्या तडाख्यात म्हसळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील रोहिणी,आडी ठाकूर, कोळा, खरसई, बनोटी, पाष्टी, निगडी, पाभरे यांच्यासहित अनेक गावांमध्ये घराचे पत्रे व कौलांचे नुकसान झाले आहे.या वादळामुळे कोणतेही जीवित नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने सतर्कता गावागावात दवंडी देऊन सतर्क राहण्याचा इशाराही दिला होते.तसेच ग्रामसेवक शिक्षक व अंगणवाडी सेविका यांना मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देखील देण्यात आले होते.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा