कोळी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण


 श्रीवर्धन:- तेजस ठाकूर

         सध्याच्या चालू असलेल्या संचार बंदीमुळे कोळी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. श्रीवर्धन शहराला पर्यटन स्थळ संबोधित असताना संचारबंदी च्या कारणास्तव पर्यटकांची ये-जा बंद असल्याने श्रीवर्धन ची सुकी मासळी विकण्यामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बहुतांश नागरीक पावसाळी कालावधीसाठी मांसाहाराचा एक पर्याय म्हणून सुकी मासळी घराघरात साठवून ठेवतात. परंतु संचारबंदी मुळे समुद्रालगतच्या गावांमध्ये पर्यटकांना जाताना न आल्यास कुठेतरी आर्थिक दृष्ट्या साखळी मोडल्याने कोळीबांधव चिंतेत आहेत.


         
कोळी बांधव मान्सून पावसाळ्याच्या आधी साठवलेली सुकी मासळी विकून पुढचे पावसाळी चार ते पाच महिने उदरनिर्वाह सांभाळतात व पावसाळा बंद होण्याच्या कालावधीमध्ये आपल्या होड्या समुद्रात सोडतात. परंतु मागच्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाची सावट आल्याने मागच्या वर्षीचा पावसाळा कालावधी निभावला परंतु यावर्षी त्याहून बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे या चिंतेने कोळी बांधवांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा