फोटो : म्हसळा ग्रामिण रुग्णालयांत होत असलेले लसीकरण , व प्रतिक्षेतील लाभार्थी
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुका व शहरासाठी एक ग्रामिण रुग्णालय, म्हसळा, मेंदडी व खामगाव अशा तीन जिल्हा परिषदेची प्रा.आरोग्य केंद्र, एक जि.प. दवाखाना व ९ उपकेंद्र अशी यंत्रणा आरोग्य सेवेच्या दिमतीला आहेत. याव्दारे तालुक्यातील ८० गावातील ६१ हजार ५४६ लोकसंखेसाठीआरोग्य सेवा पुरविली जाते अशी शासनाची धारणा आहे. ही सर्व यंत्रणा दुर्व्यवस्थेने खराब आहे. त्यामुळे म्हसळा करांच्या आरोग्याची नाव मोठे लक्षण खोटे अशी तालुक्यातील स्थिती आहे.
तालुक्यात कोरोना लसीकरण प्रा.आ. केंद्र मेंदडी येथे ८मार्च २०२१ पासून सुरू झाले आजपर्यंत केवळ ५३० लाभार्थीना लसीक रण झाले.म्हसळा ग्रामिण रुग्णालयांत १३ मार्च २०२१ पासून लसीकरण सुरू झाले आज पर्यंत ८६७ लाभार्थीना लसीकरण झाले.आजच्या स्थितीला दोनीही ठीकाणची लस संपल्याचे समजते.
तालुका आरोग्य यंत्रणेत निरुत्साह आस ल्याने तालुक्यातील जनतेकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते.
"तालुक्याची भौगोलीक रचना पहाता खामगाव प्रा.आ. केंद्रात लसीकरण सुरु व्हावे, लस पुरवठा व लसीकरणामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा वर्कर,ग्रामसेवक या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तालुक्यात कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती व प्रचार होणे आवश्यक आहे. "
महादेव पाटील,माजी सभापती,पं.स. म्हसळा.
"म्हसळा शहरांतमोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या पाहीजे, म्हसळा तालुक्याला लसीचा जादा पुरवठा व्हावा"
वैद्यकिय व्यवसायिक, म्हसळा
Post a Comment