टीम म्हसळा लाईव्ह
श्रीवर्धन येथील उपजिल्हा रूग्णालय याठिकाणी अद्ययावत ड्युरा ऑक्सिजन प्लाँटचे उद्धाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्लॉंटमुळे कोवीड रूग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रसंगी उपजिल्हा रूग्णालयातील आरोग्य विषयक आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री. दर्शन विचारे, प्रांताधिकारी श्री. अमित शेडगे, तहसिलदार श्री. गोसावी, वैद्यकीय अधिकारी श्री. दिपक पांडे व कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment