गोरेगांव, लोणेरे परिसरात पोलिसांची रॅली.मास्क न वापरणाऱ्यांवर कलम १८८ नुसार कारवाई.



 माणगाव २१ मार्च  ( राम सिताराम भोस्तेकर ) 

       संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतोय. पुनश्च लाॅकडाऊनची परिस्थिती उदभवू नये तसेच दुसरी  कोरोनाची लाट रोखली जावी.या हेतूने राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार मास्क वापरणे,सोशल डिस्टंन्स,हात धुणे आदी बंधनकारक केले असतानां राज्यातील नागरिक या अटींचे पालन न करता बेफिकीर पणे सर्वत्र फिरतानां दिसत असल्याने शासनाने कठोर पणे नियमांची अंमलबजावणी करणे सुरु केली आहे.रायगड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिलेल्या आदेशानुसार गोरेगांव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अक्षय सोनावणे, उपनिरीक्षक संजय गावडे व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गोरेगांव,लोणेरे परिसरात मास्क न वापरणा- यांना गुलाबपुष्प व मास्कचे वाटप करून हात जोडीत गांधीगिरी करीत विनंती रॅलीचे आयोजन केले होते.दरम्यांन रॅलीच्या माध्यमातून रविवार पासून परिसरात विनामास्कचा कोणी दिसल्यास त्याच्यावर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे ही पोलिसांकडून नागरिकांना बजावण्यात आले.
 शनिवार सायंकाळी ६ वा.गोरेगांव पोलिस ठाणया पासून रॅलीला सुरुवात करण्यात आली सदरची रॅली आंबेडकर चौक,छ.शिवाजी महाराज चौक ,नवी,जुनी बाजार पेठ, भैरवनाथ पेठ,मोह्ल्ला परिसरासह अन्य भागात फिरल्या नंतर पोलिस ठाण्याच्या मैदानात विसर्जीत करण्यात आली प्रसंगी उपनिरीक्षक सोनावणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की गोरेगाव लोणेरे मध्ये सदरची मोहिम चालू सुरू केली असून नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाजारपेठेत फिरताना मास्क वापर करावा.लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव आहे.कोरोना गेला या आविर्भावात लोक स्वतःहून मास्क लावत नाहीत.सर्व समाजातील नागरिकां कडून कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन व्हावे यासाठी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दुधे यांनी पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार मास्क न वापरणा- या नागरिकांना मास्कचे वाटप करुन ते लावायला सांगा. त्या नुसार पोलिस अधिक्षक यांनी पाठवून दिलेल्या मास्कचे वाटप गोरेगाव ,लोणेरे परिसरातील नागरिकांना करुन जनजागृती केली.शनिवारी मास्क मोफत देऊन नागरिकांना संधी दिली आहे मात्र रविवारी पासून मास्क कंपल्सरी अर्थात सर्वांना अत्यावश्यक असल्याचे समजावुन सांगितले व सक्त ताकीदही दिली आहे. उद्या पासून जर कोणीही  विनामास्क आढळला तर कोव्हिड १९ प्रतिबंधक कायद्यानुसार भारतिय दंड संहिता कलम १८८ नुसार फौजदारी कारवाई करणार आहोत. दिनांक २१ मार्च पासून मास्क न वापरणा- यांन वर आम्ही ही धडक मोहीम राबविणार आहोत तेंव्हा रायगडच्या सर्व जनतेसह गोरेगाव लोणेरे वासियांना सुचित करीत आहोत कि कोरोनाला हरविण्यासाठी जबाबदारीने मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा तसेच सॅनिटायझर ने वारंवार हात स्वच्छ धुवा तरच कोरोनावर आपण यशस्वीपणे मात करु शकतो.असे गोरेगावचे पो. उपनिरीक्षक सोनावणे यांनी शेवटी गोरेगाव लोणेरे परिसरातील जनतेला आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा