मागण्या मान्य न केल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करणार- दक्षिण जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड.


पोस्को महाराष्ट्र स्टील ने स्थानिक भूमिपूत्रांनी २ दोन वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनातील मागण्या अजून अपूर्णच आहे..
मागण्या मान्य न केल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करणार- दक्षिण जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड.

कंपनी च्या गेटवर जाऊन निवेदन देऊन दिला इशारा

राम भोस्तेकर माणगाव

    माणगाव तालुक्यातील विळे भागाड MIDC क्षेत्रात पोस्को महाराष्ट्र स्टील नावाची (कोरियन मॅनेजमेंट)असलेली कंपनी कार्यरत आहे ही कंपनी माणगाव तालुक्यात आल्यापासून स्थानिक भूमिपुत्रांनी रोजगार व न्याय हक्कासाठी वारंवार आंदोलने केली गेली मात्र स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळू शकला नाही दोनवर्षांपूरवी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आंदोलन केले होते त्यावेळी कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचचे आश्वासन दिले होते मात्र त्या आंदोलनातील मनसे सैनिकांची मागणी मान्य न करता कंपनी प्रशासनाने मराठीत पत्रव्यवहार न करता इंग्रजी मध्ये पत्रव्यवहार केल्याने मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी कंपनी च्या गेटसमोर जाऊन कंपनी प्रशासनाला निवेदन देऊन मागण्यांचा उल्लेख केला आहे
    २२मार्च रोजी दक्षिण रायगड मनसे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या समवेत मनसे जिल्हा उपाध्यक्षअमोल पेनकर,माणगाव तालुकाध्यक्ष सुबोध जाधव ,मनविसे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे, अण्णा घाग,मनविसे तालुकाध्यक्ष साईनाथ कुंडे,राजू सुतार, कृष्णा जाधव,मयूर जाधव, केतन डिघे, महेश साळुंके, निलेश येलकर,  आदि मनसैनिक व पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत देवेंद्र गायकवाड यांनी कंपनी ने स्थानिक भूमी पुत्रांना न्याय न दिल्यास दोन वर्षा पुर्वीची आंदोलनाची प्रतिकृती करू असे न सांगताच मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येणार असल्याचे उपस्थित पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा