म्हसळयातील ११ हजार जेष्ठ नागरीक कोरोना लसीकरणाच्या प्रतिक्षेत


म्हसळयातील ११ हजार जेष्ठ नागरीक कोरोना लसीकरणाच्या प्रतिक्षेत : लसीकरणासाठी एकच प्राथमिक आरोग्य केंद्राची निवडवड
ग्रामिण रुग्णालयात लसीकरण व्हावे : जनतेतून मागणी

संजय खांबेटे : म्हसळा 
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे.यामुळे कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी १ मार्चपासून ६० वर्षांपेक्षा अधिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना ज्यांना इतर आजार आहे, त्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु म्हसळा तालुक्यासाठी केवळ एकच लसीकरण केंद्र उपलब्ध आसल्यामुळे म्हसळयांतील जनता नाराज आहे.
तालुक्यात सुमारे ११ हजार ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आहेत. तर उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मूत्रपिंड व अन्य विकार असलेले ६ ते ७ हजार रुग्ण आहेत. तालुक्यातील सर्व लाभार्थीसाठी केवळ मेंदडी प्रा.आ.केंद्रातच लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. तालुक्यातील ६१ हजार५४६ नागरिकाना म्हसळा शहरातील ग्रामिण रुग्णालय व म्हसळा,मेंदडी आणि खामगाव या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य विषयक सेवा व सुविधा पुरविल्या जातात त्याच प्रमाणे कोव्हीड १९चे लसीकरण व्हावे असा नागरिकांचा सूर आहे
राज्यात एक न्याय तर म्हसळाकरांवर अन्याय का? महादेव पाटील घालणार पालक मंत्र्याना साकडे
तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांना श्रीवर्धन येथे लस देण्यात आली. तर जेष्ठ नागरिकाना तालुक्यात सोमवारपासून Covid १९ चे लसीकरण फक्त मेंदडी प्रा.आ. केंदात येथे होतआहे.तालुक्याचे Covid १९ चे लसीकरण म्हसळा या मध्यवर्ती ठीकाणी असणाऱ्या ग्रामिण रुग्णालयात व्हावे अशी मागणी तालुका शिवसेना प्रमुख तथा माजी सभापती महादेव पाटील पालकमंत्री ना.अदीती तटकरे यांच्याकडे लावून धरणार असल्याचे पाटील यानी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा