तळा-पुणा गाडी बंद केल्याने प्रवाशांचे हाल ; नव्याने मुरूड-तळा-पुणा सुरू करण्याची मागणी.



तळा-किशोर पितळे
कोकणातील सर्व सामान्यांची जनतेचीएकमेव लालपरीअर्थातएस्.टी.दळणवळणाचे एकमेव साधन असून तळा-पुणा नियमित चालणारी गाडी बंद केल्याने प्रवासीवर्गाचे मोठे हाल झाले आहेत सदर बसला तळा इंदापूर माणगांव मधून मोठ्या प्रमाणावर प्रवासी मिळत होते.घाट माथ्यावर जाणारे मोठा प्रवासी वर्ग असून जाण्यासाठी एकमेव गाडी असल्याने प्रवासी वर्गाला मोठा आधार होता.तसेच शाळा काँलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीचा लाभ होत होता. कोरोना काळात लाँकडाऊन असल्याने गाडी बंद होती. लाँकडाऊन उठवून जनजीवन पुर्ववत होत असताना काही काळा साठी गाडी सुरु केली त्यामुळे थोड्या फार प्रमाणात प्रवासी संख्या मंदावली आहे. हे वास्तव असू शकते पंरतु भारनियमन कमी येत असल्याचे कारण पुढे करून गाडी बंद केली आहे अशी माहिती अधीकृत अधिकारी रोहा आगारातून प्राप्त झाली आहे. गेली कित्येक वर्ष चालणारी गाडी अचानक बंद केल्याने नाराजीपसरली आहे. यागाडीला भारनियमन कमी येत असेल तर पर्यायी मुरुड- तळा -पुणा मुरुड आगारातून पुर्वीच्या वेळेत सुरु करावी. जेणे करून मुरुड तळा माणगांव स्वारगेट पुणा जाणाऱ्या प्रवाशांना लाभ होईल व महामंडळाला अधिक उत्पन्न वाढेल. तरी विभागीय कार्यालयाने त्वरीत लक्ष घालून तळा पुणा गाडी सूरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा