वानस्ते ग्रामपंचायतीत दिव्यांग निधीचे वाटप


 तळा -किशोर पितळे

तालुक्यातील मौजे वानस्ते ग्रामपंचायत हद्दीतील ११दिव्यांग बांधवाना सन२०२०/२१आर्थिक वर्षातील शासनाच्या आदेशानुसार ५%दिव्यांग निधी चे वाटप सरपंचा जनाबाई कोळी यांच्या अध्यक्षते खाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी तालुका दिव्यांग संघटना अध्यक्ष तथा पत्रकार किशोर पितळे,उपसरपंच शिवाजी गोठेकर ,सदस्य नथुराम बटावळे,प्रियंका थिटेकर,चंद्रकला नास्कर, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश बटावळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवराच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी  दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करताना किशोर पितळे म्हणाले की दिव्यांग बांधव हा खऱ्या अर्थाने अंपग नसून सुदृढ व्यक्ती हि मनाने विकलांग आहे ते खरे अंपग आहेत त्यांची दिव्यांगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे.दिव्यांग व्यक्तीचे आत्मबळ विश्वास वाढविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्नशील असून त्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव देण्यासाठी पंखात बळ वाढविण्यासाठी समाज कल्याण खात्यामार्फत विविध योजनाचा लाभ दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन केले.तसेच एस्.टी बस प्रवासी सवलत भाडे मिळतअसून शासनाच्या धोरणा नुसार स्मार्ट कार्ड पद्धत सुरू केली आहे.त्यासाठी लागणारी माहिती विस्तृतपणे देऊन स्मार्ट कार्ड नजीकच्या आगारातून काढूनघ्यावे असे आवाहनकेले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका मनिषा कुंभार रातवडकर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा