म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
रायगड जिल्ह्याच्या भौगोलिक विकासा करिता महाराष्ट्र राज्य शासना कडुन जिल्हा नियोजन वार्षिक सन आराखडा मध्ये सन 2020,2021करिता 275 कोटींचा निधी मंजूर झाला आहे हा निधी येत्या वर्षभरात लोकपयोगी विकासासाठी खर्च करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी जिल्ह्यात मंजुर प्राप्त निधी पुर्णपणे खर्च करेल त्या जिल्ह्यासाठी पुढील वर्षी घोषित केलेल्या वार्षिक आराखडा निधी पेक्षा अधिकचा 50 कोटी विकास निधी बक्षीस म्हणून देण्यात येईल असे घोषित केले आहे. मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेला बक्षीस निधी पटकविण्यासाठी आपणाकडून नक्कीच यशस्वी प्रयत्न केले जातील आणि रायगड जिल्हाच 50 कोटींचा अधिकचा निधी प्राप्त करेल असे रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी अलिबाग येथील नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वार्तालाप करताना सांगितले.
दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवन येथे जिल्हा पाणी पुरवठा आढावा सभा संपन्न झाली. या वेळी त्यांनी सविस्तरपणे माहिती देताना उपलब्ध जिल्हा नियोजन अंतर्गत निधी नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शाळा, अंगणवाडी, ग्राम पंचायत कार्यालय, सामाजिक इमारती, ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती व बांधकाम यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले नुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत सुचविलेल्या बाबींमध्ये जिल्ह्यात डायल्यासिस सेंटर,मोबाईल डायल्यासिस सेंटर,बोट अंबुलन्स, अपघात प्रसंगी रेस्क्यू टीम करता लागणारे साहित्य, ज्या प्रमाणे एनडीआरएफ कडे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध असते तसे साहित्य उपलब्धता करणे आदी बाबींसाठी निधीचा उपयोग करण्यात येणार असल्याचे आवर्जुन सांगताना मोबाईल डायल्यासिस सिस्टीम सुरू केल्यास ग्रामीण भागातील गरजु रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात किंवा मोठया शहरात जाण्याची गरज भासणार नाही तालुका ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात किंवा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेता येईल असे आपले प्रयत्न आहेत.
मदत व पुनर्वसन अंतर्गत ज्या बाबी प्रस्तावित करण्यात आलेल्या नाहीत त्या बाबींचा विकासाला जिल्हा नियोजन विकास निधींतुन प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ना. आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्याचे शिक्षण व आरोग्य मंत्री ना.उदय सावंत यांचे कडे रायगड जिल्ह्यात फार्मा कॉलेज सुरू करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात असणाऱ्या औद्योगिक क्षेत्रात स्थानिक तरुण पिढीला रोजणार उपलब्ध व्हावा यासाठी आपले प्रयत्न आसुन लवकरच फार्मा कॉलेजला रोहा येथे मंजुरी मिळावी अशा प्रकारचा प्रस्ताव तयार केला आहे.
रायगड जिल्ह्यात विभागीय क्रीडा संकुल उभारणी करण्यासाठी आपण कॅबिनेटची मान्यता मिळण्याचे प्रयत्नात असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगताना हा संकुल काही वर्षापुर्वी पनवेल येथे करण्यासाठी प्रस्तावित होता परंतु तेथे आवश्यक असणारी शासकीय 30 ते 35 एकर जागा उपलब्ध नसल्याने विभागीय क्रीडा संकुल रायगडात करण्याची मागणी केली आहे. सुधागड येथे आदिवासी सामाजिक विकासासाठी भव्यदिव्य संकुलाची उभारणी करण्यात येणार असून संकुलात 250 विध्यार्थ्यांना शिक्षण व होस्टेलची व्यवस्था,महिला बचत गटांना प्रशिक्षण व स्टॉल,100 खाटाचें सुसज्ज हॉस्पिटल जेणेकरून एकाच ठिकाणी आदिवासी समाजातील गरीब गरजु घटकाला शिक्षण,आरोग्य आणि रोजगार उपलब्ध होणार आहे.
ना. आदिती तटकरे यांनी अधिक माहिती सांगताना लेबर कोर्टातील 175 प्रकरणे ही उत्तर रायगड जिल्ह्यातील आहेत त्या अनुषंगाने अलिबाग बार असोसिएशनने महाड येथील लेबरकोर्ट अलिबाग येथे स्थलांतरित करण्याची मागणी केले नुसार त्यास हायकोर्टाने मंजुरी दिली आहे आणि हे लेबरकोर्ट आता अलिबागला सुरू होणार असल्याचे सांगितले या मुळे पनवेल, पेण, अलिबाग येथील नागरिकांना सोयीचे होणार असल्याचे सांगितले. जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत महाराष्ट्र शासनाने कोकण विभागात मोठा असलेल्या ठाणे जिल्ह्यासाठी 400 कोटी रुपये, रायगड जिल्ह्यासाठी 275 कोटी,रत्नागिरी जिल्हा 250 कोटी,सिंधुदुर्ग 170 कोटी आणि पालघर उपनगर विकासासाठी 180 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचे वार्तालाप करताना सांगितले.

Post a Comment