मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
महाराष्ट्र शासनाकडुन मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरु करण्यात आली असुन राज्याच्या दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल भागामधील पशु पालकांकडील पशुरुग्णांसाठी फिरते पशुचिकित्सा पथक सुरु करण्यास राज्य शासनाकडुन मान्यता देण्यात आली आहे.त्यानुसार पशुसंवर्धन विभागाकडुन पहील्या टप्प्यात ऐंशी तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक सुरु करण्यात येत आहे. श्रीवर्धन तालुक्यासाठी मंजुर झालेल्या पशु चिकीत्सालय वाहनाचे लोकार्पण शुक्रवार दि.२६ फेब्रु.रोजी श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीच्या प्रांगणात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पशुचिकित्सा वाहनाबाबत माहीती देताना आदिती तटकरे यांनी सांगीतले की,"राज्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या पशुपालकांना आपल्या पशुरुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याचदा आर्थिक भार परवडणारा नसतो त्यामुळे पशुवैद्यकीय सेवेअभावी पाळीव जनावरांचा मृत्यु होऊ शकतो तसेच केंद्र शासनाने लाळखुरकुत रोगमुक्त प्रदेशासाठी महाराष्ट्र राज्याची निवड केलेली आहे त्यामुळे पशुरोगांचे प्रभावी नियंत्रण करणे आवश्यक आहे.या बाबी विचारात घेऊन,राज्याच्या दुर्गम भागासह पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्याची संख्या कमी आणि दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा असणाऱ्या तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना महाराष्ट्र शासनाकडुन राबविण्यात येणार आहे."
महाराष्ट्र शासनाच्या या योजनेमुळे ज्या अती दुर्गम भागात पशु वैद्यकीय सेवा पुरवली जात नाही.तिथे हे वाहन पोहचून त्यांना सेवा देणार असल्याने अती दुर्गम भागातील पशुपालकांना त्याचा लाभ होणार असुन त्यांच्या पशुधनावर वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.१९६२ हा टोल फ्री क्रमांक पुणे येथुन कार्यान्वयीत झाल्यावर पशुपालक या क्रमांकावर संपर्क साधुन या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परीषद कृषी सभापती बबन मनवे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आरले,श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे,तहसीलदार सचिन गोसावी,जिल्हा परिषद सदस्य प्रगती अदावडे,पंं.स.सदस्य मिना गाणेकर,मंगेश कोमनाक,प्र.गट शिक्षण अधिकारी शितल तोडणकर,
तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.संतोष निमुणकर (फिरते रुग्णालय),सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.बिरवाडकर,मंडळ अधिकारी सुनिल मोरे,तलाठी निलेश पवार,बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीच्या सरपंच नम्रता गाणेकर,उपसरपंच प्रकाश तोंडलेकर,ग्राम पं.सदस्य ग्रामसेवक व सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment