९० फुटी रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा मनसे करणार उग्र आंदोलन
ठाकुर्ली मधील दोन मोठ्या रस्त्यांकरीता मनसेची गांधीगिरी...
केडीएमसी अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत खराब रस्त्याबद्दल दिल्या शुभेच्छा...
९० फुटी रस्ता आणि कल्याण डोंबिवली समांतर रस्ता गेल्या वर्षभरापासून खराब....
डोंबिवली : डोंबिवलीहून कल्याणला जाण्यासाठी दोन महत्त्वाचे रस्ते म्हणजेच ९० फुटी रस्ता आणि कल्याण डोंबिवली समांतर रस्ता.ठाकुर्ली मधील हे दोन मोठे आणि प्रमुख रस्ते असून गेल्या वर्षभरापासून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि रखडत चाललेले भुयारी गटाराचे काम यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अखेर याला वाचा फोडण्याकरीता डोंबिवली मनसेतर्फे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.यावेळी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन रखडलेल्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि आता काम केले नाहीतर मनसे आंदोनल करू असे मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी सांगितले...
Post a Comment