टीम म्हसळा लाईव्ह
राज्यातील प्रत्येक तालूक्यातील एक याप्रमाणे जिल्हा परिषदांच्या ३०० शाळा या आदर्श शाळा (मॉडल स्कूल) म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उत्तम भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन या तीन निकषांवर या शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.
या शाळांचा विविध स्तरावर विकास केला जाणार आहे. यामध्ये आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, 'आयसीटी' आणि विज्ञान प्रयोगशाळा यांचा समावेश आहे. या शैक्षणिक सुविधांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकाबाहेरचे शिक्षण दिले जाणार आहे. यात वाचन, लेखनावर विशेष भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिकस्तरावर भाषा आणि गणित विषयातील मूलभूत संकल्पना शिकविल्या जाणार आहे. ग्रंथालयामध्ये परिपूर्ण शैक्षणिक पुस्तके, विश्वकोष आदी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
Post a Comment