कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही शालेय शुल्कात ३०% कपात करावी - मनसे


कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही शालेय शुल्कात  ३०% कपात करावी -मनसे नेते बाळा नांदगावकर

टीम म्हसळा लाईव्ह

कोरोना माहामारीचा सर्वांनाच मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसला आहे. अशात पालकांना मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी अवघड जात आहे.कर्नाटक सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देत जसं शालेय फी मध्ये ३० टक्यांची सुट दिली आहे. तशीच महाराष्ट्र सरकारनेही द्यावी अशी मागणी निवेनाद्वारे शालेय शिक्षण मंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते मा.श्री.बाळा नांदगावकर, मनसे उपाध्यक्ष अरविंद गावडे, मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, विभागअध्यक्ष शेखर गव्हाणे, वैभव शिंदे यांच्या शिष्टमंडळांनी केली.
शाळेच्या फी बद्दल शाळा व पालक यांच्यातील तिढा सोडवावा. शाळा अनेक महिने बंद असल्याने त्यांचीही अनेक दैनंदिन खर्चात मोठी बचत झाली आहे व ३०-४०% फी कमी केल्यास पालक हि ती भरू शकतील.
तसेच मोठ्या प्रमाणात फी जमा झाल्यास शाळेचे रुतलेले आर्थिक चक्र हि मार्गी लागेल. याबद्दल शासनाने तातडीने निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याने शाळा व पालक अशा दोन्ही घटकांना दिलासा देता येईल.
कर्नाटक सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देत जसं शालेय फी मध्ये ३० टक्यांची सुट दिली आहे. तशीच महाराष्ट्र सरकारनेही द्यावी अशी मागणी मनसेचे नेते श्री.बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या मागणीबाबत कायदेशिर बाबी तपासण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले व लवकरात लवकर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा