आंबेत- म्हाप्रळ फेरीबोट सेवेचे भाडे कमी करा. - महेश शिर्के



म्हसळा ( बाबू शिर्के)
सावित्री नदीवरील आंबेत पुलाचे काम चालू असल्याने त्या मार्गावरील वाहतूक सध्या फेरीबोट द्वारे सुरू करण्यात आली आहे.आंबेत विभागातील 20 ते 22 गाव वाडीमधील ग्रामस्थ दवाखाना आणी बाजारपेठेसाठी नेहमी म्हाप्रल येथे जात येत असतात.तसेच म्हाप्रल येथील विद्यार्थी आंबेत आणी गोरेगाव येथे नेहमी प्रवास करीत असतात.ही फेरीबोट ची सेवा सामान्य नागरिक, विद्यार्थी आणी स्थानिक रिक्षावाले यांचा साठी सुद्धा भांडी आकारणी करणार आहे.तरी स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणी रिक्षा चालक यांना प्रवासी भाड्यात 50 % सवलत अथवा मोफत प्रवासाची मुभा दयावी अशी मागणी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेश शिर्के यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.तसेच बागमंडला, वेशवी फेरीबोटचा जो दर आहे.त्यापेक्षा आंबेत म्हाप्रल हे अंतर कमी असल्याने सर्व सामन्यासाठी सुद्धा दर कमी करण्यात यावा अशीही मागणी या निवेदनात महेश शिर्के यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा