म्हसळा / प्रतिनिधी
जगावर कोसळलेल्या कोविड-१९ चे (कोरोना) संकट दूर
करण्याच्या प्रयत्नात माहिती व जनसंपर्क महासंचालय मंत्रालय मुंबई, जिल्हा माहिती कार्यालय
व जिल्हा प्रशासन रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-१९ चा वाढता
प्रादुर्भाव, सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी आणि उपाययोजना या बाबतीत अरुणोदय
सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्या. खरसई या संघटनेकडून म्हसळा तालुक्यातील
म्हसळा शहर, खामगाव, पाभरे, मेंदडी, तुरुंबाडी येथे पथानाट्याद्वारे जनजागृतीचा
कार्यक्रम आयोजित केला होता.
स्त्री-पुरुष असे दहा कलाकार असलेल्या गायक वादक
या कलाकारांनी कोविड-१९ ची लक्षणे सांगितली. ताप, खोकला, श्वास घेण्यास अडचण, स्नायू
वेदना, थकवा जाणवत असल्यास टाळाटाळ न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोविड-१९
पासून बचाव करण्यासठी सतत मास्कचा वापर करा, पाण्याने वारंवार हात धुवा, कोरोना
बाधीत व्यक्तींना वेळेत उपचार मिळाल्यास ती व्यक्ती कोरोना मुक्त होऊ शकते. तसेच
कोरोनाच्या महामारीत डॉक्टर, पोलीस यंत्रणा व इतर समाजसेवी संघटनांनी केलेल्या
अनमोल सहकार्याबद्दल त्यांचेही आभार मानले.
यावेळी म्हसळा तालुक्यातील परिविक्षाधीन तहसिलदार
श्री.अनिकेत सोनावणे, गोविंद चाटे, गणेश महाडीक, विश्वास पाडावे, खरसई सरपंच निलेश
मांदाडकर, नईम दळवी व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.

Post a Comment