दिघी सागरीचे API महेंद्र शेलार यांची पोलीस निरीक्षकपदी बढती : निरोप व सत्कार समारंभात मानले सर्वांचे आभार
मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.महेंद्र राजाराम शेलार यांची गृह विभागाकडुन मिरा-भाईंदर, वसई-विरार येथे पोलीस निरीक्षपदी बढती झाल्याबद्दल बोर्ली पंचक्रोशीतील नागरीकांच्या वतीने त्यांचा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम दिघी सागरी पोलीस ठाणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दि.२५ फेब्रु.रोजी कोरोना संसर्ग नियमांचे पालन करुन पार पडला.
कोणत्याही शासकीय आधिकाऱ्याची बदली,बढती हा त्यांच्या जीवनातील आविभाज्य भागच आहे.महेंद्र शेलार यांनी आपली सेवा बजावताना कोरोना महामारीतील टाळेबंदीच्या काळात आपल्या सहकारी तसेच महसुल व आरोग्य प्रशासन यांच्या सहाय्याने नागरीकांच्या आरोग्य सुरक्षा दृष्टीकोनातुन प्रसंगी घेतलेले कठोर निर्णय यामुळे दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यात ते यशस्वी झाले.त्याचबरोबर श्रीवर्धन तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाने दिलेल्या प्रचंड तडाख्यामुळे रस्त्यांवर पडलेल्या मोठ मोठ्या वृक्षांमुळे जनतेपर्यत प्रशासनाची मदत वेळेत पोहचू शकत नव्हती अशावेळी नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणुन आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतः जातीने रस्त्यावर उतरुन रस्ता मोकळा करण्याचे काम अशा प्रमुख कामांनी व आपल्या कर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केली.सेवेच्या कालावधीत त्या भागासाठी केलेले काम,राबवीलेल्या योजना आपली कार्यशैली व आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक या जोरावरच शांत स्वभावाचे प्रसंगी तितकेच कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी महेंद्र शेलार हे जनतेच्या गळ्यातील ताईत बनले.पोलीस निरीक्षकपदी बढती मिळालेले शेलार आपल्या सत्कारप्रसंगी म्हणाले,"आजपर्यंत माझा असा निरोप समारंभ कुठेही कधीही झाला नाही आपल्याकडुन मिळालेल्या या प्रेमामुळे मी गहीवरलो आहे.आपल्या सर्वांची आठवण सदैव स्मरणात राहील." पंचक्रोशीतील नागरिकांनी व सर्वपक्षीय नेत्यांनी आम्हाला नेहमीच चांगले सहकार्य केले.तसेच माझ्य सहकाऱ्यांची साथ व वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चांगली सेवा देण्याचा प्रयत्न मी केला आहे. " येथील सर्वच लोकप्रतिनिधींनी मला व पोलीस खात्यातील सर्व सहकाऱ्यांना कायदा सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी वेळोवेळी सहकार्य केले आहे त्या सर्वांचा मी ऋणी आहे. याप्रसंगी गावातील मान्यवर, सर्वपक्षीय नेते व पत्रकार उपस्थित होते.
Post a Comment