अयोध्येतील राम मंदिरासाठी शैलेश पटेल यांच्याकडून 25 हजारांचा निधी



म्हसळा ( बाबू शिर्के)

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देशभरात  निधी संकलनाची मोहीम सुरू झाली असून हा निधी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र नावाने स्वीकारला जाणार आहे. देशभरात ही मोहिम राबविला जात आहे. 27 फेब्रुवारी पर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे. प्रत्येकजण स्वेच्छेने निधी देऊ शकतो. त्या अनुषंगाने म्हसळा तालुक्यात सुद्धा मोठया प्रमाणात निधी गोळा होत आहे. म्हसळा तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक आणी बीजेपी चे माजी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल यांनी 25 हजाराचा निधी चेक स्वरूपात म्हसळा निधी संकलनचे कार्यकर्ते यतीन करडे आणी प्रसाद पोतदार यांचा कडे सुपूर्द केला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा