गोरेगाव बस स्थानकात श्रीसिद्धीविनायक मंडळ, अलिबागच्या वतीने कोविड-19 विषयक जनजागृती.



किरण शिंदे / लोणेरे

रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड- अलिबाग व श्री सिद्धीविनायक सामाजिक, सांस्कृतिक मंडळ, अलिबाग या मंडळाच्या  वतीने आणि मनोज शिवाजी सानप- जिल्हा माहिती अधिकारी, रायगड- अलिबाग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व एन. डि. पाटील - मंडळ अधिकारी, गोरेगांव यांच्या उपस्थितीत गोरेगांव बस स्थानकात कोविड-19 विषयक घ्यावयाची खबरदारी, कोविड लस सुरक्षित आहे तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती पथनाट्याच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक मंडळाच्या कलाकारांनी दिली. या पथनाट्यात सिद्धांत पाटील, निशिता पाटील, वैष्णवी नागे, निकिता कंटक, प्रांजली पाटील, तुषार राऊळ, मानसी पाटील, स्वाती सुर्वे, रोमा सावकार, हेमांगी पाटील आदि कलाकार सहभागी झाले होते...

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा