भाजपच्या पाठपुराव्याला यश ; जिओ अधिकार्यांना आली जाग.


भाजपच्या पाठपुराव्याला यश ; जिओ अधिकार्यांना आली जाग.

दिघी गणातील सत्ताधारी फक्त खुर्च्या तापविण्यासाठी.:- आशुतोष पाटील भाजपा सरचिटणिस श्रीवर्धन.

पुष्कर रिळकर
      वेळास पंचक्रोशीतील गावां मध्ये गेली अनेक महिने जिओ सोबत सर्वच कंपनीचे नेटवर्क कोलमडले होते.
यामुळे स्थानिक ग्राहकांचे खुप गैरसोय होत होतीे.वेळास व आदगाव या गावांमध्ये शाळा,हायस्कुल आहेत.या ठिकाणी खुप विद्यार्थी क्षिक्षण घेत आहेत.कोरोना मुळे सर्वच शाळा बंद आहेत.यामुळे शाळांनी आँनलाईन क्षिक्षण चालु केल आहे.पण या गावांमध्ये कोणतही सक्षम नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना आँनलाईन अभ्यास करायला मिळत नव्हतं.
      तसेच अलीकडे निसर्ग चक्रीवादळामुळे या भागाच खुप नुकसान झालं आहे.यामुळे स्थानिक नागरिकांचे मुंबई अडकलेल्या आपल्या नातेवायीकांशी संपर्क करता येत नव्हतं.तसेच लाँकडाऊन मुळे सर्वच वस्तु मोबाईल द्वारे फोन करुन मागवाव्या लागत आहेत परंतु सक्षम नेटवर्क या भागात नसल्यामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत होती.
     ही बाब श्रीवर्धन भाजपा विद्यार्थी आघाडीने उघडकीस आणली होती.हेच लक्षात घेऊन हि बातमी सर्व दैनिक व्रुत्तपत्रांनी ने लावुन धरली होती यामुळे या भागातील लोकांच्या गैरसोयीची दखल नेटवर्क कंपन्यानी घेतली आणि आता पुन्हा एकदा नेटवर्क पुर्वव्रत करण्यासाठी जिओ कंपनी ने नविन टाँवर वेळास या गावात उभा करण्यास सुरुवात केली आहे.या टाँवर चे काम प्रगतीपथावर असुन येत्या 30 दिवसांमध्ये हे काम पुर्ण होईल.आणि या टाँवर मुळे वेळास पंचक्रोशितील गावांमधील  नेटवर्क चा प्रश्न सुटणार आहे.

दिघी गणातील सत्ताधारी पक्षाचे नेते फक्त नावासाठी आहेत ते या विभागातील कोणत्या ही समस्ये वर उपाय काढण्यासाठी पुढे येत नाहीत आणि पंचायत समिती च्या खुर्च्या बसुन तापवण्याच काम करत आहेत. असा आरोप भाजपा चे सरचिटणिस  श्री.आशुतोष पाटील यांनी केला आहे.
         नेटवर्क ची अडचण सोडविण्यासाठी भाजपा युवा मोर्चा ने खुप मेहनत घेतली आहे असे आशुतोष पाटील म्हणाले आणि आता श्रेय लाटण्यासाठी अनेक लोक पुढे येतील त्यांना जणताच धडा शिकवेल असेहीते म्हणाले.

लोकसंख्या जास्त असल्यामुळे नेटवर्क ची अडचण होत आहे असे जिओ कं.च्या टिम ने केलेल्या निरिक्षणानुसार समजले आहे यावर उपाय म्हणुन नविन टाँवर बसवण्याच काम कंपनी ने हाती घेतल आहे. (श्री.अखिलेश मिश्रा, जिओ कं अधिकारी)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा