म्हसळा पोलीसानी कलम ३५४ अ ने युवकाला दिला जोरदार झटका

म्हसळा पोलीसानी कलम ३५४ अ ने युवकाला दिला जोरदार झटका.विवाहीत इसमाला घेतले पोलीसानी ताब्यात
(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा तालुक्यांत पॉस्को अंर्तगत तसेच,अत्पवयीन मुलीच्या छेड-छाडीबाबत अनेक गुन्हे पोलीस दाखल करीतत आसताना नाच म्हसळा पोलीसानी एस.टी.प्रवासा दरम्यान ४९ वर्षीय इसमाने प्रवासी महीले जवळ जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने संबंधीत विवाहीत इसमाला तात्काळ अटक केल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले.याबाबत म्हसळा पोलीस स्टेशनचे ठाणे अमलदार सुर्यकांत जाधव यानी महीलेच्या फिर्यादीवरून गु.र.नं.६५/२o२० भादवी३५४(अ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे, आरोपी अब्दुल कादीर अहमद ताजीर वय ४९ रा.लोअर तुडील ता.महाड याला पोलीसानी ताब्यात घेतले .गुन्ह्याचे गांभीर्य पहाता उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब पवार यानी तात्काळ म्हसळा पोलीस स्टेशनला भेट दिल्याचे सपोनी धनंजय पोरे यानी सांगितले गुन्ह्याचा तपास पो.ह. संतोष चव्हाण करीत आहेत.आरोपी अब्दुल कादीर विवाहीत असून त्याला दोन मुले आसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा