किरण शिंदे
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक यांना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. सध्या करोना विषाणू (कोविड-19) संसर्गाचा धोका निर्माण झाला असल्यामुळे शासनाकडून गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात येत आहेत. करोना विषाणूच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्यामुळे या योजनेला दि. 31 मार्च 2021पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
तसेच दि. 30 एप्रिल 2021 पासून जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी त्वरित नजिकच्या आगारातील संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून, जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड नोंदणी करावी व राज्य परिवहन महामंडळाच्या या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, राज्य परिवहन रायगड विभाग, पेण यांनी केले आहे.
Post a Comment