म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचाचे आरक्षण 17 डिसेंबर ला जाहीर होणार



म्हसळा (वार्ताहर)
म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीद्वारे गुरुवार दिनांक 17 डिसेंबर रोजी निश्चित होणार आहे.तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 ते 2025 दरम्यान सार्वजनिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे अनुसूचित जाती, जमाती तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता व महिला राखीव करीता  आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरुवारी (ता 17) सकाळी 11 वाजता न्यू इंग्लिश स्कुल म्हसळा सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.ही सोडत पद्धत आरक्षित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.इच्छुकांनी तसेच सर्व पक्षीय अध्यक्षांनी या सरपंच पदाच्या आरक्षण कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान तहसीलदार शरद गोसावी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा