'दुर्गांच्या देशातून'दिवाळी अंक भाटे वाचनालयाला भेट



रोहा (वार्ताहर)
ट्रेकिंगवरील पहिला दिवाळी अंक 'दुर्गांच्या देशातून' याचे नुकतेच पुण्यात प्रकाशन झाले. सदर अंकाच्या पहिल्या पानावर झळकण्याचा मान रोह्यातील सुप्रसिद्ध गड, किल्ले अभ्यासक रायगड भूषण सुखद राणे यांनी पटकावला असून त्यांचा या दिवाळी अंकातील पाली दरवाजा राजगड येथील फोटो वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. तसेच या दिवाळी अंकात रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पाऊलवाटा हा त्यांचा अभ्यासपूर्ण लेख देखील चोखंदळ वाचकांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला आहे.
नुकताच प्रसिद्ध झालेला व अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या दिवाळी अंकाच्या प्रति सुखद राणे यांनी भाटे वाचनालयाला रवीवारी भेट म्हणुन दिल्या.रोहेकरांनी वाचनालयातून घेवून हा अंक जरूर वाचवा असे आवाहन सुखद राणे यांनी रोहेकरांना केले आहे.
भाटे वाचनालयाचे अध्यक्ष किशोर तावडे यांच्याकडे सदर अंकांच्या प्रति सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी पत्रकार विश्वजित लुमण, निखिल दाते, मिलिंद शेडगे,राजेश मेहेता आदी मान्यवर उपस्थित होते.
सुखद राणे यांचे गड किल्यांची माहिती देणारे पुस्तक लवकरात लवकर प्रसिद्ध व्हावे अशा सद्भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा