नगरपंचायत प्रशासकीय इमारत व शहरातील विविध विकास कामे व पायाभूत सुविधांचा प्रश्न समन्वयाने सोडवणार : खासदार सुनील तटकरे


नगरपंचायत प्रशासकीय इमारत व शहरातील विविध विकास कामे व पायाभूत सुविधांचा प्रश्न समन्वयाने सोडवणार : खासदार सुनील तटकरे
(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा नगरपंचायत हद्दीतील स्वच्छता आणि चांगल्या आरोग्यासाठी घनकचरा व्यवस्थापन गरजेचे आसुन शहरा लगत शासकीय जागेत घनकचरा व्यवस्थापन कामाचे शुभारंभ आणि नव्याने दोन घंटा गाडीचे हस्तांतरण खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांचे समावेत पक्षाचे जेष्ठ नेते अलिशेट कौचाली, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे,उपनगराध्यक्ष सुहेब हळदे,नगरपंचाय-तीच्या नगराध्यक्षा जयश्री कापरे, माजी सभापती नाजीम हसवारे ,बांधकाम सभापती करण गायकवाड, पाणी पुरवठा व जल निस्सारण सभापती कविता बोरकर, महिला व बालकल्याण सभापती सेजल खताते, नगरसेवक दिलीप कांबळे, संजय कर्णिक, मुख्याधिकारी मनोज उर्किडे, काँग्रेस (आय)चे नाझीम चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रियाजभाई घराडे,मुस्लीम जमातीचे भाई दफेदार ,अ.शकूर घनसार व अन्य मंडळी उपस्थित होती.यावेळी खासदार सुनील तटकरे यानी म्हसळा नगर पंचायती-च्या माध्यमातून आम्हाला गेले साडेचार वर्ष सेवा करण्याची संधी दिलीत त्या बद्दल म्हसळा करांना धन्यवाद दिले. नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारत व शहरातील विविध विकास कामे व पायाभूत सुविधां-चा प्रश्न काही शिल्लक आहेत ते समन्वयाने सोडवणार असल्याचे खासदार तटकरे यानी सांगितले.
यावेळी खासदार तटकरे यानी त्यांच्यावर झालेल्या कोव्हीड संक्रमण रोगावर मात करीत असताना सतत १५ दिवसाचा एकाकी पणा व याच कालावधीत सर्वानी केलेले, प्रेम,प्रार्थना या बळावर मी कोव्हीड मुक्त झालो व आज १५ ते २० दिवसा-च्या कालावधीनंतर म्हसळा करांजवळ विकासाचे निमित्ताने थेट सेवा करण्याची मिळालेली संधी मी माझे भाग्य समजतो कारण म्हसळाकारांची वैचारीक पातळी, धर्मनिरपेक्षपणा, सामाजिक अधिष्ठान, या सर्वांचे माझ्या मनांत विशेष आदर व प्रेम आहे. यावेळी खासदार तटकरे यानी विविध विकास कामांबाबत सांगताना हायब्रीड अन्युटीने होणारा लोणेरा- गोरेगाव- श्रीवर्धन रस्ता, पर्यटनाला उद्योगाचा दर्जा, त्यापासून पर्यटन व्यवसायाला मिळणारी चालना आणि श्रीवर्धन,तळा, मुरुड या सर्व तालुक्याना मध्यवर्ती असणारा म्हसळा तालुक्याला भवीष्यांत महत्व येणार असल्याचे तटकरे यानी सांगितले.
खासदार तटकरे यांची भाजपावर सडकून टिका
महाराष्ट्र राज्यात पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याची घाई असलेल्या भारतीय जनता पक्षाला जगा बरोबर देशात आणि आपल्या राज्यात कोरोना प्रादुर्भाव कार्यान्वित असताना बंद असलेली सर्व धर्मीय प्रार्थनास्थळ आणि श्रद्धास्थान उघडण्यात यावीत याची घाई झाली होती तसेच सत्तेत असलेले आघाडी सरकारला हिंदु धर्माचा विसर पडला की काय अशी बोचरी टीका टिप्पणी राज्यातील भाजप मंडळी सातत्याने करीत होती भाजपचे मंदिर उघडण्याची घाई आणि हिंदुत्व हे केवळ राजकीय हेतु आणि सुडभावना असल्याचे मत रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी मांडताना केंद्र सरकारने निर्सग चक्रीवादळ व अवेळी पावसासारख्या अपत्तीच्या परीस्थितीत महाराष्ट्राला मदत सोडाच G.S.T व अन्य करांच्या परताव्याची रक्कम सुध्दा दिली नसल्याची टिका यावेळी खासदार तटकरे केली .
आरोग्य व स्वच्छतेसाठी म्हसळा नगरपंचायतीला फार मोठया प्रमाणांत निधी दिला असून म्हसळा करांची भावी पीढी सदृढ व आरोग्य विषयक तंदुरस्त रहाण्यासाठी मुख्याधीकारी व नगरपंचायतीने आरोग्य व स्वच्छतेविषयी नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आसल्याचे सांगितले.
फोटो .घनकचरा व्यवस्थापन कामाचे शुभारंभ आणि नव्याने दोन घंटा गाडीचे हस्तांतरणाचे वेळी संबोधीत करताना खासदार तटकरे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा