टाळेबंदी शिथिलीकरणात ग्रंथालये सुरू करण्याची रायगड जिल्हा ग्रंथालय संघाची मागणी

 

फोटोः रायगड ग्रंभालय संघाचे पदाधिकारी निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर पद्मश्री बैनाडे यांना निवेदन देताना

( म्हसळा प्रतिनिधी)

टाळेबंदी शिथिलीकरणाचा पाचवा टप्प्या सुरू झाला आहे. उपहारगृहे, मद्यालये आणि अन्य उद्योग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी सार्वजनिक वाचनालये खुली करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. शासनाचे आदेशानुसार मार्च 2020 पासून जिल्ह्यातील शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालये व वाचनालये बंद ठेवण्यात आली आहेत. Covid 19 चे नियमांचे अधीन राहून सर्व ग्रंथालये व वाचनालयात पुस्तक देवघेव विभाग सुरू करणेस परवानगी मिळवी असे निवेदन रायगड जिल्हा ग्रंथालय संघाने निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर पद्मश्री बैनाडे यांना आज दिले आहे. रायगड जिल्ह्यात एकूण शासनमान्य 76 ग्रंथालये आहेत. त्यापैकी 4 ग्रामपंचायत हद्दीत आहेत व जिल्ह्यातील तब्बल 8 (आठ)ग्रंथालये शंभर वर्षे पूर्ण केलेली आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील वाचक, अभ्यासक व विद्यार्थी यांना पुस्तके व संर्दभ ग्रंथ मिळत नाहीत. कोविड प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन सर्व शासनमान्य ग्रंथालये करतील अशी हमी जिल्हा संघाने दिली आहे. त्यामुळे फारशी गर्दी होत नसलेल्या ग्रंथालयात बंदी घालून सरकारने काय साध्य केले हा अनुत्तरित प्रश्न आहे.

"महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अवघ्या काही दिवसांनंतर आहे. जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालये सुरु झाल्यास त्याचा मोठा उपयोग परीक्षार्थींना होणार आहे." नागेश कुळकर्णी प्रमुख मार्गदर्शक रायगड जिल्हा ग्रंथालय संघ


"रायगड जिल्ह्यातील वाचनसंस्कृती जोपासण्याचे कार्य शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालये करत आहेत. वाचकहित लक्षात घेऊन ग्रंथालये लवकरात लवकर सुरू झाली पाहिजेत"

संजय बोदारडे अध्यक्ष रायगड जिल्हा ग्रंथालय संघ


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा