घोणसे, देवघर परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडीत ; नागरिक त्रस्त



म्हसळा : बाबू शिर्के
घोणसे, देवघर  परिसरात मागील दोन महिन्यांपासून  रात्रीच्या वेळेस एक फेज जाऊन किमान १५ ते . १६ रोहीत्रांचा विजपुरवठा खंडीत होत आहे . परिणामी चिखलप घोणसे देवघर कुडतुडी देवघरकोंड आदी परिसरातील नागरिकांना काळोखातच रहावे लागत आहे . तसेच ऑनलाईन अभ्यास मुळे वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.अगोदरच कोरोना आणी चक्रीवादळ तसेच वाढीव बिलांमुळे नागरीक त्रस्त आहेत त्यात या विजेचा लपंडावाने नागरिक हैराण झाले आहेत या परिसरातील वायरमन ची बदली झाली असून त्यांची जागा रिक्त आहे . निसर्ग चक्रीवादळापूर्वी या परिसरातील एमएस्वीच हा  चिखलप, सरवर,चिखलप रोडलगत होता . यातील सरवर, चिखलप रोडलगत चा एमएस्वीच रद्द करून तो साईचेक पोस्ट जवळ बसविण्यात आलेला आहे . तसेच येथील झंपर सुद्धा काढून टाकण्यात आलेले आहेत . तसेच जे.एम. म्हात्रे इन्प्रास्ट्रक्चर घोणसे येथे नव्याने एमएस्वीच बसविण्यात आलेला आहे. जे . एम . म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर पासून देवघरकोंड कुडतुडी परिसरात गेलेली लाईन ही जवळपास जंगलातूनच गेलेली आहे . त्यामुळे याभागात काही बिघाड असू शकतो . त्यामुळे जर का चिखलप . रोडवरील काढणेत आलेले झंपर पुन्हा लावून जे .एम . म्हात्रे . इन्फ्रास्ट्रक्चर घोणसे येथील एमएस्वीच बंद केल्यास सहा ते सात गावातील वीज सुरु राहू शकते . मात्र असा कोणताही प्रयत्न म्हसळा वीज वितरणाकडून केला जात नाही . असा आरोप देवघर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल महामुनकर यांनी केला आहे.विशेष म्हणजे या विभागातील विजेच्या समस्या सोडवण्याकरीता कोणतेही लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी पुढाकार घेताना दिसत नाहीत ही शोकांतिका आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा