फोटो :डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रतिमेचे पूजन व उपस्थित मान्यवर
टीम म्हसळा लाईव्ह
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने म्हसळा तालुका सार्वजनीक वाचनालय येथे वाचनालय व पंचायत समिती तालुका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रतिमेचे पूजन सार्वजनिक वाचनालयाचे हॉलमध्ये करण्यात आले व प्रा. शिक्षण विभागा मार्फत व्हीडीओ कॉन्फरसद्वारा वाचनालयाचे संचालक व वसंतराव नाईक कॉलेजचे ग्रंथपाल प्रा.आर.एस. माशाळे यानी तालुक्यांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकाना वाचनाचे शैक्षणिक उपक्रमांत महत्व कसे आसते विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद लागावा या साठी शाळांतून विविध कार्यक्रमाचे आयोजन कसे व्हावे या बद्दल मार्गदर्शन करताना विविध पुस्तकांचे वाचन करताना वाचकाने पुस्तकाचे शिर्षक- प्रस्तावना -मनोगत या सर्वाचा तुलनात्मक आभ्यास .करून त्याचे सार आपल्याअन्य मित्र मंडळीना सांगावे याबाबत सुध्दा मार्गदर्शन केले, त्यामुळे वाचन संस्कृती व वाचकांच्यात वाढ होते हे आभ्यासू सांगितले.
यावेळी तालुक्यातील सुमारे ८०प्राथमिक व माध्यमिक शिक्षकानी व्हीडीओ कॉन्फरस चा लाभ घेतला कार्यक्रमाला सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,प्रभारी गटशिक्षणाधिकारी व्यंकट तरवडे, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष शेडगे ,प्रा .आर.एस. माशाळे, न्यू इंग्लीश स्कुलचे प्राचार्य काशिनाथ जाधव,चंद्रसेन चौधरी, ग्रंथपाल उदय करडे ,धनश्री नाक्ती, सायली चोगले,दीपक पाटील,संदीप भोनकर,उमेश गोराडे अनिल बेडके दत्ता राम महाडिक, रईस परकार,काळूराम राठोड,नंदकुमार जाधव किशोर पेलेकर, प्रमोद गायकवाड,चंद्रसेन चौधरी ही मंडळी उपस्थित होती. यावेळी म्हसळा तालुक्यांतून वाचन संस्कृती सकारात्मक व सास्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी गृप बनविण्याबाबत निश्चित केले.
Post a Comment