आंबा काजू विमा संरक्षण योजनेचा लाभ घ्यावा. -नितीन करंजे ता. कृ. अधिकारी




तळा (किशोरपितळे)
निसर्गाच्या लहरीपणामुळे व सद्याच्या बदलत्या वातावणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे म्हणून शासनाने आंबा काजू पिक विमा संरक्षण योजना आणली असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तळा तालुका कृषी अधिकारी नितिन करंजे यांनी केले आहे.यावर्षी जिल्ह्यात बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्या कडून मिळणार असून ट़ोल फ्री क्र.(१८००२०९५९५९)असून ३०नोव्हेंबर पर्यंत आहे. यावर्षी ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक नसून या योजनेत सहभागी नसून शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होणेचे नसल्याचे किमान सात दिवस आगोदर बँकेत कळवीणे मात्रबंधनकारक आहे. आंबा पिकासाठी हेक्टरी ७०००/-विमा रक्कम असून काजू पिकासाठी५ ०००/-अशी असून विमा संरक्षण आंबा रू १४००००/-व काजूला १०००००/-विमा लाभ मिळणार आहे.अवेळी पाऊस, कमी जास्त तापमान या तीन कारणाने विमा योजना लागू होईल. शेतकऱ्यांनी अर्जासोबत फोटो,आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स,७/१२उतारा,स्वंयघोषणापत्र अशी पुर्तता करावी.शेतकरी विमा अर्ज राष्ट्रीयकृत बँक किंवा आपले सरकार या वेब साईटवर अर्ज भरता यैईल.मागील वर्षी ७९२ लाभार्थ्यांना ४कोटी रकमेचा विमा संरक्षण दिले आहे.अशी माहिती दिली तरी शेतकरी वर्गाने लवकरात लवकर  संपर्क साधावा
अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल अधिकारी व तालुका कृषी विभाग अधिकारी यांच्या कडे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा