म्हसळ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या "संवाद" मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळणार
महा विकास आघाडीतील सर्वच घटकपक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता
संजय खांबेटे : म्हसळा
राष्ट्रवादी काँगे्रसने रायगड जिल्ह्यात ‘मिशन रायगड’ सुरु केले आहे. जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली तालुका पातळीवर बैठका सुरु केल्या आहेत. उत्तर रायगडांत पक्षाला प्रचंड यश येत असताना पालकमंत्री अदीती तटकरेच्या मतदार संघातील बलाढय अशा म्हसळा तालुक्यांत पालकमंत्री आदीती ताई तटकरे, खासदार सुनील तटकरे , विधान परिषदेचे सदस्य आमदार अनिकेत तटकरे रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी २ वा.घनसार काँम्प्लेक्स येथे म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्याजवळ संवाद साधणार ,कोणते मार्गदर्शन करणार याचा स्वाद घेण्यासाठी राज्य शासनाचे महा विकास आघाडीतील घटक पक्षांतील कार्यकर्ते सुध्दा उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. खासदार तटकरे भाजपला टार्गेट करतानाच शिवसेना, शेकाप आणि काँग्रेस (आय)या महाआघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत ‘नो एंट्री’ राहणार असल्याने घटक पक्षांतील कार्यकर्ते सहज उपस्थित राहण्याची शक्यता राजकिय क्षेत्रांतून वर्तविली जात आहे.
पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भास्कर दाजी विचारे,प्रदेश चिटणीस अलीशेट कौचाली, रा.जी.प उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा परिषदेच्या सभापती गीताताई जाधव, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे,पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्षा गीताताई पालरेचा, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे,रायगड जिल्हा अल्प संख्याक सेल अध्यक्ष नाझीम हसवारे,ओबीसी सेल अध्यक्ष गणेश पवार आदी मान्यवर, तालुका लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहणार असल्याचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी माहिती देताना सांगितले.
Post a Comment