हवामान खात्याकडून आलेल्या सूचनेनुसार उद्या दि 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान चक्रीवादळ माणगाव तालुक्यातील गोरेगाव या भागातून म्हसळा तालुक्यातून श्रीवर्धन चे दिशेने पुढे सरकणार आहे यावेळी 55 ते 60km प्रतीतास या वेगाने वारे वाहणार आहेत तसेच संपूर्ण तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी ची होण्याची शक्यता आहे.
तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांनी वादळाच्या वेळी पक्क्या घरात आसरा घ्यावा , झाडाखाली उभे राहू नये.
👉 सखल भागात नागरिकांनी सतर्क रहावे.
👉विजांचा कडकडाटासह वादळी वारा वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभे राहू नये. विजेचे खांब, लोखंडी वस्तू, विद्युत वस्तू पासून दूर रहावे.
👉सुखे अन्न पदार्थ, बॅटरी, पुरेस औषधे, पिण्यासाठी पाणी इ. व्यवस्था करण्यात यावी.
👉 कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ तालुका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
तालुका नियंत्रण कक्ष,
तहसील कार्यालय, म्हसळा
*फोन - 02149 232224

Post a Comment