MPSC व पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील परीक्षा निश्चित होईपर्यंत वयोमर्यादा वाढविणे बाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन.


एम पी एस सी व पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील परीक्षा निश्चित होईपर्यंत वयोमर्यादा वाढविणे बाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन. 

किरण शिंदे / लोणेरे

मराठा आरक्षण व कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने  एम पी एस सी च्या परीक्षा सलग तिसऱ्यांदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे.
परंतु या दरम्यान एम पी एस सी व पोलिस भरतीतील ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कोणतेही प्रयोजन राज्य सरकारने  नियोजित केलेले नाही. एकंदरीत वर्तमान  परिस्थितीनुसार सरकारने जरी निर्णय घेतला असला. तरीही एम पी एस सी व पोलीस भरतीची परीक्षा निश्चित होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी. जेणेकरून सरकारच्या निर्णयामुळे कोणत्याही समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. आझाद हिंद संघटना मराठा आरक्षणा सोबत आहे. परंतु मराठा आरक्षणावर निर्णय होईपर्यंत एम पी एस सी व पोलीस भरतीची परीक्षा घेण्यात येऊ नये असा पवित्रा मराठा आरक्षण समन्वय समितीने घेतला आहे.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे जाहीरही केले आहे. परंतु सदर निर्णयामुळे दरम्यानच्या काळात सर्व समाजातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येजबार होणार आहेत. या करिता सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत परीक्षेचा कालावधी निश्चित होईपर्यंत वाढ करण्यात यावी.अशी मागणी करण्यात येत आहे.
 अन्यथा महाराष्ट्रातील वयोमर्यादा संपलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे कॅरियर संपुष्टात येणार आहे आणि त्यास सर्वस्वी महाराष्ट्र सरकार कारणीभूत ठरेल. 
तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील भावी अधिकारी बेरोजगार राहतील.
 उपरोक्त दोन्ही धोके व संभाव्य परिस्थिती लक्षात घेता आपण या संदर्भात त्वरित संबंधित विभागांना आदेशित करून विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढविण्याचे आदेश पारित करावे अशी मागणी आझाद हिंद संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष  रामचंद्र बांबू झोरे आणि तालुका अध्यक्ष संदेश पवार यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा