मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्र चक्रीवादळा नंतर अद्यापही अंधारात:रुग्णवाहिकेतून आणवे लागते पाणी:आठ गावातील रुग्णांचे हाल
म्हसळा(निकेश कोकचा)
म्हसळा तालुक्यातील सर्वात मोठ्या मेंदडी ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण सेवा शेवटचा घटका मोजत आहे.या रुग्णालयात चक्रीवादळा नंतर गेलेली लाइट अद्याप आलेली नसून दवाखान्यात पाणी आणण्यासाठी कर्मचार्यांना रुग्णवाहिका घेऊन वणवण फिरावे लागत आहे.
अधिकार्यांच्या अनास्थेचा बळी पडलेल्या म्हसळा तालुक्यातील मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रात समस्यांचा डोंगर आहे.या आरोग्य केंद्रात ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळा नंतर गेलेली लाइट अद्याप आलेली नसून वादळानंतर उडालेले पत्रे देखील जैसे थे अवस्थेते आरोग्य केंद्राच्या आवारात पडलेले आहेत.आरोग्य केंद्रात पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने कर्मचार्यांना रुग्णवाहिका घेऊन पाण्यासाठी वणवण फिरावे लागते.आरोग्य केंद्रातील डॉक्टर आपल्या सोयीनुसार ये-जा करत असल्याने मेंदडी,मेंदडी कोंड,मेंदडी आदिवासी वाडी, वारळ, रोहिणी, तुरुंबाडी, काळसूरी, आडी ठाकुर,गोंडघर,खाणलोशी या वाडी व गावातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहे.मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध नसल्याने व रात्रीच्यावेळेस डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड देखील सहन करावे लागत आहे.
निसर्ग चक्रीवादळ आल्या नंतर मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पत्रे उडाले आहेत.पत्रे नसल्याने पावसाचा पाणी आत येऊन भिंती ओल्या झाल्याने बोर्डात शॉर्टसर्किट होत आहे.पत्रे दुरूस्ती साठी मेंदडी,पाभरा व खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवला आहे.
- डॉ.गणेश कांबळे,तालुका वैदकीय अधिकारी
फोटो- प्राथमिक आरोग्य केंद्र मेंदडी येथील निसर्ग चक्रीवादळामध्ये उडलेले पत्रे जैसे थे अवस्थेत दिसत आहेत.दुसर्या छाया चित्रात कर्मचार्यांना राहण्यासाठी तयार केलेल्या निवासस्थानाची झालेले दुरावस्था दिसत आहे. (छाया-निकेश कोकचा)
Post a Comment