पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी दि.31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन


टीम म्हसळा लाईव्ह

शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व सस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरवण्यात येते. सन 2018- 2019 व 2019-20 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थांकडून दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. 
पुरस्काराचे स्वरूप व अर्हता पुढीलप्रमाणे- 

राज्यस्तरीय पुरस्कार 
रु.1 लाख एक रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा.ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याचे 5वर्ष पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

विभागीय पुरस्कार 
रु.25 हजार एक रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 7 वर्षे कार्य असावे.  नोंदणीकृत संस्थेस दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा.  संस्था राजकारणापासून अलिप्त असावी.  तसेच तिचे कार्य व सेवा ही पक्षतीत व राजकारणापासून अलिप्त असावी.

जिल्हास्तरीय पुरस्कार:-
रु.10 हजार एक रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बालविकास क्षेत्रात किमान 10 वर्ष सामाजिक कार्य असावे.  ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे, त्या महिलांना पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.
      वरीलप्रमाणे अर्हता असणारे इच्छुक व्यक्ती, संस्थांनी संबंधित पुढील आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. 
पुरस्कारासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे-

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार 
प्रस्तावधारकांची माहिती केलेल्या कार्याचा तपशिल, वृत्तपत्र फोटोग्राफ्स इत्यादी, सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहे, यापूर्वी पुरस्कार मिळाले आहे काय? असल्यास तपशिल.  
विभागीयस्तर पुरस्कार:- संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल, वृत्तपत्र कात्रणे, संस्थेत यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे काय? असल्यास तपशील, संस्था नोंदणी प्रमाणपत्र घटनेची प्रत.

पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून  निवड समितीकडून ज्या समाजसेविका, संस्था यांची निवड होईल त्यांनी सादर करावयाची प्रमाणपत्रे 
उपविभागीय अधिकारी यांचे विनादुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलीस विभागाचे प्रमाणपत्र,  सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, संस्था 10 वर्षापासून महिला व बाल विकास क्षेत्रात कार्यरत असल्याचा मागील 3 वर्षाचा अहवाल, संस्थेच्या घटनेची प्रमाणित प्रत. 
       इच्छुक व्यक्ती, संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, अलिबाग, निलपुष्प बिल्डिंग, एमआयडीसी ऑफिस समोर, नागडोंगरी,अलिबाग (दूरध्वनी क्र.02141-225321) येथे संपर्क साधावा. तसेच परिपूर्ण प्रस्ताव सादर आवश्यक त्या कागदपत्रांसह करण्याची दक्षता घ्यावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा