मांघरुण-दापोली-पंदेरी पुलाच्या कामाला मंजुरी ; माणिक जगताप यांच्या प्रयत्नांना यश


मांघरुण-दापोली-पंदेरी पुलाच्या कामाला मंजुरी
माणिक जगताप यांच्या प्रयत्नांना यश
लवकरच काम मार्गी लावणार माजी आमदार माणिकराव जगताप

राम भोस्तेकर माणगाव

रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांनी  महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे महाड तालुक्यातील गंधारी, दादली,टोल आणि मांघरूण पंदेरी रस्त्यांच्या कामांना नाबार्ड योजने अंतर्गत मंजुरी मिळावी म्हणून मागणी केली होती.या मागणीची दखल घेऊन राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेब यांनी मांघरुण-दापोली-पंदेरी पुलाच्या कामाला मंजुरी दिली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हा पूल नादुरुस्त होता तो केव्हाही कोसळेल अशी अवस्था होती.या पुलावरून रोज शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ जा ये करतात.पावसाळ्यात या पुलाची उंची कमी असल्यामुळे सतत पुलावरून पाणी जात असे त्यामुळे ग्रामस्थांचे व विद्यार्थ्यांचे तसेच कोण आजारी पडले तर त्यांना खूप गंभीर परिस्थितिचा सामना करावा लागतो ही अडचण लक्षात घेऊन माणिकराव जगताप साहेबानी त्या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून कामाला मंजुरी मिळवली. त्याच प्रमाणे वरील मागणी केलेले उर्वरित रस्ते आणि पुलाच्या कामाला पण लवकरच मंजुरी दिली जाईल असे अशोकराव चव्हाण साहेब म्हणाले.पंदेरी रस्ता देखील या पूर्वी खचला होता त्याचे काम देखील माणिकराव जगताप यांनी सांगितले.पंदेरी पुलाला मिळालेल्या मंजुरीमूळे वाळण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी माणिकराव जगताप साहेबांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा