पालकमंत्री ना. आदिती तटकरेंनी ऐकून घेतल्या रोहेकरांच्या समस्या


पालकमंत्री ना. आदिती तटकरेंनी ऐकून घेतल्या रोहेकरांच्या समस्या ; प्रश्न मार्गी लावण्याच्या क्षमतेचे रोहेकरांनी केले कौतुक
रोहा (वार्ताहर)
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तसेच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या कार्यतत्पर आमदार आदिती तटकरे यांनी सोमवारी दुपारी दीड ते अडीच या वेळेत ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे उपस्थित राहून रोहेकरांच्या व्यथा जाणून घेतल्या.
अत्यंत एकाग्रचित्ताने रोहेकरांच्या विविध विषयांसंबंधिच्या समस्या जाणून घेतांनाच त्यांनी काही समस्यांचे बसल्याजागीच निराकरण करुन आपल्यातील कार्यक्षमतेची चुणूक दाखवली त्यांच्या क्षमतेचे या वेळी उपस्थित रोहेकरांनी विशेष कौतुक केले.
रायगडचे खासदार सुनिल तटकरे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अशा प्रकारे जनतेशी संवाद साधून रोहेकरांच्या समस्या सोडवायचे ,ना. आदिती तटकरेंच्या व्यक्तिमत्वात व कार्यशैलीत  देखील तीच झलक पहायला मिळत असल्याचे जुन्या जाणत्या लोकांनी यावेळी आवर्जून सांगितले.
नागरिकांच्या व्यथा जाणून घेवून त्याची योग्य ती उकल करण्याचा प्रयत्न ना. आदिती तटकरेंनी या वेळी केला.
यावेळी रोह्याचे उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर अध्यक्ष अमित उकडे, युवा नेते रविंद्र चाळके, मयुर खैरे आदींसह रोहे शहर व परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा