आगामीकाळात तालुक्यातील विकास कामाची पूर्तता - खा. सुनील तटकरे


टीम म्हसळा लाईव्ह

तालुक्यातील विविध विकास कामे आपल्या कार्यकाळात आगामी काळात पूर्ण करणार असल्याची ग्वाही रायगड चे खासदार सुनील तटकरे यांनी पोलादपूर येथील आयोजित कार्यक्रम प्रसंगी दिली आहे पोलादपूर तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला या वेळी त्याचे खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले 

यावेळी व्यासपिठावर रायगड जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा प्रतिमा जाधव, तालुकाध्यक्षा प्रतिभा पवार, तालुकाअध्यक्ष वाय.सी.जाधव, शहरअध्यक्ष अजित खेडेकर, विधानसभा सरचिटणीस सुहास मोरे, ज्येष्ठ नेते कृष्णादादा करंजे, सुभाष जाधव, महाड तालुकाध्यक्ष निलेश महाडीक, अभंग सुरेश जाधव, अल्पसंख्यांक अध्यक्ष महमद मुजावर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते या वेळी कापडे खुर्द, किनेश्वरवाडी, मोरगिरी, कालवली भोसलेवाडी तसेच अन्य ग्रामीण भागातील ग्रामस्थ व कार्यकर्ते यांनी जाहिर प्रवेश केला. 

या वेळी खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना, पोलादपूर तालुक्यांमध्ये विकासाचे अनेक प्रश्न असताना नैसर्गिक आपत्ती, रोजगार, पर्यटन तसेच उद्योगनिर्मितीसारखे प्रश्न सोडविण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदिवी गावातील भूस्खलनाकडे स्थानिक ग्रामस्थ सह जागरूकपणे लक्ष वेधून केलेल्या पाठपुराव्यामुळे सरकारचे याप्रश्नी लक्ष वेधले असून याकामी लवकरच पुन्हा सर्व वरिष्ठांसोबत पाहणी करण्यात येईल, अशी माहिती यावेळी दिली

पोलादपूर तालुक्यातील विकासाचा अनुशेष दूर करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकतो हे सर्वांना उमगले असल्याने पक्षाची ताकद तालुक्यात वाढत असल्याचे सांगत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेऊन विकासाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी साथ दिली त्यांच्या अपेक्षांना खरे उतरण्याची जबाबदारी खासदार म्हणून वैयक्तिक जबाबदारी असल्याचे सांगितले राज्यातील आघाडी सरकारमधील रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनीही घेतली आहे. यामुळे आपण पोलादपूर तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे झुकते माप देऊ, अशी ग्वाही खा.सुनील तटकरे यांनी येथे दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा