कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या निधीतुन श्रीवर्धन तालुक्यातील शाळांना संगणक संच भेट

बोर्लीपंचतन (मकरंद जाधव)
कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार मा.बाळाराम पाटील यांनी श्रीवर्धन तालुक्यातील गरजु माध्यमिक शाळांना आपल्या आमदार निधीतुन संगणक संचासाठी निधी उपलब्ध करुन दिला असुन जिल्हा नियोजन समिती मार्फत श्रीवर्धन तालुक्यातील १९ गरजु माध्यमिक शाळांना प्रत्येकी दोन संगणक व एक प्रिंटर अशा संचाचे  वाटप करण्यात आले.

     सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे युग असून सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर आता अपरीहार्य आहे.डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना संगणकाचे संपुर्ण ज्ञान व हाताळण्याचे कौशल्य प्राप्त होणे हि आता काळाची गरज आहे.त्याच अनुषंगाने श्रीवर्धन तालुक्यातील काही गरजु माध्यमिक शाळेत संगणकाची प्राथमिक गरज पूर्ण करुन विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करणे त्याचबरोबर तालुक्यात माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे परीपुर्ण ज्ञान मिळावे हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन व डिजिटल इंडीयाच्या स्वप्नपूर्तीसाठी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या आमदार निधितुन यापुढेही संपुर्ण कोकण विभागातील गरजु माध्यमिक शाळांना संगणक उपलब्ध करुन देण्यासाठी करीत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे शैक्षणिक क्षेत्रातुन समाधान व्यक्त होत आहे 

  यावेळी बोर्लीपंचतन येथील श्री मोहनलाल सोनी विद्यालयात सोमवार दि.२१ सप्टेंबर रोजी झालेल्या संगणक वाटपाच्या छोटेखानी कार्यक्रमात बोर्लीपंचतन, दिवेआगर,भरडखोल,दिघी,शिस्ते, वडवली,आदगाव या माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक,श्रीवर्धन तालुका पुरोगामी शिक्षक संघटना अध्यक्ष अमोल भोसले,लीलाधर खोत सर,विश्वास तोडणकर,अमित पाटील, अन्सार चोगले,अथर पांगारकर व जनता शिक्षण संस्था बोर्लीपंचतनचे अध्यक्ष गणेश पाटील सर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा