यावर्षी मान्सून वाहनाच्या तालावर नाचणारतरी सुध्दा पाऊस दमदार असणार महेश जोशी



संजय खांबेटे : म्हसळा
या वर्षी पंचाग अभ्यासकांच्या संकेता- नुसार पावसाची सुरवात, मध्यकाळ व शेवट हा सर्वच प्रवास दमदार असेल असा अंदाज म्हसळा शहरांतील ज्योतिषाचार्य व पंचाग अभ्यासक महेश हरीभाऊ जोशी यानी वर्तविला आहे.
अतिवृष्टीचा योग असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी हवामानात उकाडा सुद्धा अधिक होण्याचा संभव आहे. 
पुष्य नक्षत्र : वाहन हत्ती
रविवार दि.१९ जुलै रोजी रात्री १० वाजून ३६ मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करीत आहे. वाहन हत्ती असून गुरु आणि शनी नीर नाडीत आहेत. त्यामुळे या नक्षत्राचा पाऊस दमदार ह होण्याची शक्यता असेल ,दरम्यान, या संपूर्ण प्रवासात पाऊस त्या त्या नक्षत्राच्या वाहनाच्या तालावर नाचणार असल्याचे अर्थात जलवर्षाव करण्याचे संकेत जोशी यानी वर्तविले. त्यानुसार रविवारी सुरू होणाऱ्या पुष्य नक्षत्रात त्याचे वाहन असलेल्या हत्तीच्या सोंडेतून धो धो वर्षाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आश्लेषा नक्षत्र : वाहन मेंढा
आश्लेषा नक्षत्र रविवार दि. २ आॅगस्ट रात्री ९.२८ ला सुरू होते. या नक्षत्राचे वाहन मेंढा असून अग्निमांडल योग असल्याने या नक्षत्राचा पाऊस ओढ धरेल असे दिसते. मात्र नक्षत्राच्या शेवटी पर्जन्यमान सुधारेल. दिनांक २,३,४,१३,१४, १५ आॅगस्ट या दिवशी पाऊस अपेक्षित आहे.
मघा नक्षत्र : वाहन म्हैस
मघा नक्षत्र रविवार दिं.१६ आॅगस्ट रविवारी रात्री ७ वाजून ११ मिनिटांनी सुरू होते. वाहन म्हैस असून या नक्षत्रातील पाऊस दिलासा देणारा असेल. काही प्रदेशात अतिवृष्टीची शक्यता राहील. दि. १७ ते २१,२७,२८,२९ आॅगस्ट पाऊस अपेक्षित आहे .
पूर्वा नक्षत्र : वाहन बेडूक
रविवार दि.३०आॅगस्ट दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी सूर्य पूर्वा नक्षत्रात प्रवेश करतो. वाहन बेडूक आहे. रवी, बुध, शुक्र,शनी जल नाडीत आहेत. सुरुवातीला पाऊस चांगला, पण नंतर कमी पण सर्वदूर पाऊस होईल. दि.३०,३१आॅगस्ट तसेच १ ते ३ ,९ ते ११ सप्टेंबरला पाऊस अपेक्षित आहे .
उत्तरा नक्षत्र :वाहन मोर 
रविवारी दि.१३ सप्टेंबर सकाळी ९ वाजून २ मि. सूर्याचे उत्तरा नक्षत्र सुरू होते. वाहन मोर असून वायू मंडल योग आहे. या नक्षत्राचा पाऊस विखुरला जाऊन काही ठिकाणी चांगली वृष्टी तर काही ठिकाणी वारा सुटून पाऊस निघून जाईल. दि.१३ ते १७,२५ व २६ सप्टेंबर पाऊस कमी जास्त प्रमाणात अपेक्षित आहे. या खरीप हंगामात पिक पाणी उत्तम असेल असे महेश (गुरूजी ) जोशी यानी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा